HomeBreaking Newsवर्षभरात १ हजार ८ भजन मंडळांचे भजन कार्यक्रम आयोजन करण्याचा मानस -...

वर्षभरात १ हजार ८ भजन मंडळांचे भजन कार्यक्रम आयोजन करण्याचा मानस – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूर : शहराच्या विकासकामांसाठी मोठा निधी आपण उपलब्ध करुन दिला आहे. सोबतच क्रीडा, सांस्कृतीक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही आपण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने काम करत आहोत. अध्यात्माकडुन दुरावत चाललेल्या समाजाला भजन किर्तनातून अध्यात्माचे महत्व आणि त्याचे फायदे याबात जनजागृतीचे काम आपल्या वतीने भजन महोत्सवाच्या माध्यमातुन केल्या जात आहे. येत्या एक वर्षात १ हजार ८ विविध भाषिय भजन मंडळांचे भजन कार्यक्रम घेण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विवेक नगर येथे राम नवमी निमित्त विविध भाषिय चार दिवसीय 100 भजन मंडळांच्या भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर भजन महोत्सवाच्या दुस-या दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांनी भजन महोत्सवाला भेट दिली. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, चंद्रशेखर देशमुख, विश्वजित शाहा, करणसिंह बैस, देवा कुंटा, भाग्यश्री हांडे, आशा देशमुख, वैशाली मेश्राम, कल्पना शिंदे, नितीन शाहा, मुन्ना जोगी, तिरुपती कलगुरुवार, राकेश पिंपळकर, सायली येरणे, सविता दंडारे, हेरमन जोसेफ, कल्पना शिंदे, गोपी मित्रा, प्रतिक हजारे, विमल कातकर, हेमलता पोईनकर, चंदा ईटनकर, अस्मिता डोनारकर, नीलिमा वनकर, आनंद रणशूर आदिंची उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरातील विविध भागात भजन महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. महाशिवरात्री पासुन या महोत्सवाला सुरवात करण्यात आली होती. त्यानंतर अनेक भजन मंडळांनी सदर आयोजन नियमीत घेण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार सदर आयोजन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने केल्या जात आहे. पुढेही सदर आयोजन होत राहतील असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

नामस्मरण व भजन तसे एकट्यानेही करता येते. परंतु, समविचारी सहकार्यांना बरोबर घेऊन टाळ, मृदुंग, वीणा यांच्या साथीने, गोड गळ्याने, सुस्वर पद्धतीने, सर्वांनी मिळून जर श्रद्धेने भजन केले तर, तेच समाजहिताचे ठरते. भजणे म्हणजे सेवा करणे. देवाची वारंवार स्तुती करणे, देवाला आठवणे, भजनातून देवाची प्रार्थना करणे, देवाला आनंदित करून प्रसन्न करणे, यासाठी भजन करायचे असते. यातुन मानवातील नकारत्मता संपूर्ण त्याच्यात सकारत्कता निर्माण होते. ईच्छाशक्ती प्रबळ होते. मनातील वाईट वृत्तीचा नाश होतो. त्यामूळे भजन – किर्तनाची आजही समाजाला गरज असल्याचे यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. सदर भजन महोत्सवात भजन मंडळांसह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!