Homeगडचिरोलीगडचिरोलीत ट्रकची स्कूल व्हॅनला धडक, दहापैकी चार विध्यार्थी गंभीर जखमी

गडचिरोलीत ट्रकची स्कूल व्हॅनला धडक, दहापैकी चार विध्यार्थी गंभीर जखमी

गडचिरोली: गडचिरोली येथील नवेगाव मार्गावर स्कूल व्हॅन आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दहा विद्यार्थी जखमी झाले आहेत.

जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गडचिरोली पोलिसांकडून  घटनास्थळाची पंचनामा लरून गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू आहे.

गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नवेगाव परिसरात भरधाव ट्रकने विद्यार्थ्यांना नेणाऱ्या शाळेच्या व्हॅनला धडक दिली. या अपघातात बस रस्त्यावर पलटली तर ट्रक दुसऱ्या बाजूला जाऊन शिरला. अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु, बसमध्ये असलेले विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.या अपघातात दहा विद्यार्थी जखमी झाले.

गडचिरोलीत नवेगाव खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना नेणारी व्हॅन पंचर झाल्यानंतर दुरुस्तीसाठी उभी होती. छत्तीसगडहून येणा-या ट्रकने व्हॅनला धडक दिली. त्यानंतर व्हॅन पलटली. त्या व्हॅनमध्ये असलेले दहा विद्यार्थी जखमी  झालेत. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार विद्यार्थी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.गडचिरोली पोलिसांकडून घटनास्थळाची पंचनामा लरून गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!