HomeBreaking Newsआल्लापल्लीच्या खेळाडुंची राष्ट्रीय पातळीवर धडक

आल्लापल्लीच्या खेळाडुंची राष्ट्रीय पातळीवर धडक

आलापल्ली: उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील लालजी टंडन स्टेडियममध्ये झालेल्या ‘फर्स्ट हँड टू हँड फायटिंग स्पोर्ट्स या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा च्या समारोप झाला. अंतिम फेरीत महाराष्ट्राने 17 सुवर्णपदके 16 रौप्यपदके व 11कांस्यपदकासह तृतीय विजेतेपद पटकावले.

त्यात फाईट इव्हेंटमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली चे खेळाडू रेश्मा कोरसा आणि सुरेश माने यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. तसेच अनन्या सामलवार, काजल गुट्टे, सनी सलामे यांना रजतपदक मिळाले. सर्व पदक विजेत्यांचे 19 मे ते 23 मे दरम्यान उझबे किस्तानमध्ये मध्ये होणाऱ्या कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे.

ऑक्टोंबर महिन्यात इटलीतील मिलान येथे होणाऱ्या प्रौढ (वरिष्ठ) जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही ते सहभागी होणार आहे. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व राहुल मेश्राम तसेच प्रशिक्षक म्हणून रवी चेर्लावर आलापल्ली त्यांनी जबाबदारी सांभाळली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!