Home गडचिरोली मार्कंडादेव व चपराळाच्या महाशिवरात्रीला यात्रा होणार- आमदार डॉ देवराव होळी

मार्कंडादेव व चपराळाच्या महाशिवरात्रीला यात्रा होणार- आमदार डॉ देवराव होळी

3174

गडचिरोली – विदर्भाची काशी मार्कंडादेव व चपराळा देवस्थानच्या महाशिवरात्रीच्या यात्रा या वर्षी नियोजित वेळी होणार असल्याची माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली असून माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
*यावेळी बैठकीला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार मारोतरावजी कोवासे, पोलीस अधीक्षक अंकितजी गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, मार्कंडा देवस्थान समितीचे अध्यक्ष गजाननजी भांडेकर, मार्कंडा व चपराळा देवस्थान समितीचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
मागील दोन वर्षापासून कोरोना मुळे यात्रा होऊ शकली नाही माञ यावर्षी यात्रा व्हावी अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा असल्याचे आमदार देवरावजी होळी यांनी या बैठकीत बोलून दाखवले . सर्वसामान्य लोकांच्या भावनांचा आदर करीत सन्माननीय जिल्हाधिकारी यांनी या यात्रांना मंजुरी दिली असून जिल्ह्यातील जनतेने या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे.

Don`t copy text!