Homeगडचिरोलीविदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर कॅम्प मधील हत्तीचे स्थलांतरण थांबवावे याकरिता जय विदर्भ...

विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर कॅम्प मधील हत्तीचे स्थलांतरण थांबवावे याकरिता जय विदर्भ पार्टीचे निवेदन 

विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात कमलापूर येथे राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प आहे अर्ध्या शतकापासून असलेल्या हत्ती कॅम्प मध्ये ८ हत्तीचं वास्तव्य आहे. याशिवाय जवळच्या आलापल्ली येथे ३ हत्ती आहेत. गुजरात मधील रिलायन्स इंडस्ट्रीज तर्फे उभारल्या जात असलेल्या प्राणिसंग्रहालयात विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील ११ ही हत्तींना स्थलांतरित केले जाणार आहे. याला ‘जय विदर्भ पार्टी’चा विरोध आहे. याकरिता आज दि :-13 जानेवारी 2022 ला मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एवं पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावे नागपूर विभागीय आयुक्त यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
विदर्भातील पर्यटन प्रेमी हत्तींना बघण्यासाठी मोठ्या संख्येने वेगवेगळ्या भागातून कमलापूर कॅम्प येथे भेट देतात. या भागात तलाव, निसर्गरम्य वातावरण आणि सभोवताल घनदाट जंगल असल्याने वनपर्यटनाच्या दृष्टीने कमलापूरची एक वेगळी ओळख विदर्भात निर्माण झाली असून तेथे भेट देणाऱ्या पर्यटकांपासून स्थानिकांना मोठा रोजगार प्राप्त झाला आहे म्हणून नवीन पिढी नक्षलवादाकडे पाठ दाखवीत आहे. त्याभागातील नक्षलवाद संपुष्टात आलेला आहे. विदर्भात पर्यटन वाढत असताना हत्तीचे परप्रांतात स्थलांतरण करून पर्यटनाच्या खच्चीकरणाचा जो कट रचण्यात आलेला आहे हे विदर्भातील जनतेला मान्य नाही.
कमलापूरातून हत्तीला काही कारणास्तव स्थानांतरित करावयाचे असेलच तर आमच्या विदर्भात पेंच अभयारण्य, नवेगाव बांध अभयारण्य, नागपूर जवळील गोरेवाडा प्राणी संग्रहालय, ताडोबा व्याघ्र प्रकल्प, बोर धरण अभयारण्य तथा संपूर्ण विदर्भ जंगलाने व्यापला आहे . दुसरे असे की हत्ती हा शाकाहारी प्राणी असल्यामुळे येथे जंगल आणि पाणी आहे तेथे त्याचे वास्तव्य अधिक चांगले राहील आणि विदर्भात या दोन्ही संपत्ती विपुल आहेत. विदर्भाचे खच्चीकरण करू नका अन्यथा जय विदर्भ पार्टीच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

निवेदन देताना जय विदर्भ पार्टी अध्यक्ष अरुण केदार, महासचिव विष्णू आष्टीकर, उपाध्यक्ष मुकेश मासुरकर , पॉलिट ब्युरो सदस्य तात्यासाहेब मते,अरविंद भोंसले, मध्य नागपूर अध्यक्ष नरेश निमजे, पाटनसावंगी माजी सरपंच अनिल पानपत्ते, कार्यालयीन सचिव प्रशांत तागडे उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!