“सावित्रीबाई फुले जयंती मोहोत्सव व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बुद्धविहार लोकार्पण सोहळा”

0
17

नागपूर जिल्हा प्रतिनिधी: 
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दक्षिण नागपुर मधील मानेवाडा रोड वरील सवित्रीबाई फुले नगर मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव मोठ्या हर्ष उल्लासाने साजरी करण्यात आली
1 जानेवारी ला लहान लहान बालकांच्या माध्यमातून भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यात आला. 2 जानेवारी ला बुद्धभीम गीतांचा बहारदार जलसा आयोजित करण्यात आला तसेच 3 जानेवारी ला सकाळी भव्य समता रॅली दुपारी भिक्षु संघाला भोजनदान करून त्यांच्या नेतृत्व महापरित्राण पाठ घेऊन बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली. तसेच संध्याकाळी भन्ते आर्य नागार्जुन सुराई ससाई यांच्या हस्ते रिबीन कापून बुद्ध विहाराचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून महाराष्ट्र शासन,समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त मा.डाॅ.सिद्धार्थ गायकवाड प्रमुख उपस्तिथी म्हणून जयंती चित्रपटाचे नायक मा.ऋतुराज वानखेडे उपस्तिथ होते.तसेच या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विध्यार्थीचा सत्कार करण्यात आला व समग्र फौंडेशनच्या माध्यमातून *सत्यशोधक संघर्षवादी हे सुप्रसिद्ध नाटक सादर करण्यात आले.या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहुन भरघोस प्रतिसाद दिला.हा कार्यक्रम 7 जानेवारी ला आवाज इंडिया टिव्ही वर सुद्धा प्रसारित करण्यात आला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बिद्ध विहार समिती,त्यागमुर्ती आई रमाई महिला संघर्ष समितीयुवा परिवर्तन बहुद्देशीय सामाजिक संस्था

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here