Homeगडचिरोलीकढोली येथे मतिमंदत्वाविषयी जनजागृती कार्यक्रम...

कढोली येथे मतिमंदत्वाविषयी जनजागृती कार्यक्रम…

कौशल्य निवासी मतिमंद विद्यालय बोदली , गडचिरोली च्या वतीने मा. मुख्याध्यापक श्री. प्रशांत जोशी यांच्या मार्गदर्शनात जागतिक दिव्यांग दिना चे औचित्य साधून कढोली ता. चामोर्शी येथे मतिमंदत्वा विषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.

या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच श्री. जितेंद्र हुलके, प्रमुख पाहुणे म्हणुन उपसरपंच सौ. अल्का हुलके, सदस्या सौ.दीपा वाकुडकर, सौ. मंदा कोवे उपस्थीत होते. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन शाळेचे मानसशास्त्रज्ञ श्री. शशिकांत शंकरपुरे यांनी मतिमंदत्व – कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, समाजातील असणारे समज-गैरसमज यावर विस्तृत मार्गदर्शन केले.

याप्रसंगी विशेष शाळेचे महत्त्व पटवून देतांना मानसशास्त्रज्ञ व विशेष शिक्षिका सौ. तनुजा मोहीते यांनी विशेष शिक्षणाची जनजागृती होणे गरजेचे आहे जेणेकरून पालक स्वतः पुढाकार घेऊन विशेष गरजा अ असणारया मुलांना विशेष शिक्षणाचा लाभ देतील व या माध्यमातून विशेष गरजा असणारी मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल व शासनाचे उद्दिष्ट देखील सफल होतील असे विचार व्यक्त केले.

कार्यक्रमा चे प्रास्ताविक विशेष शिक्षक श्री. राजू भोमले तर आभार प्रदर्शन परिचारिका कु. किरण निकोडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. सुशिल हुलके , सौ. शैला देशमुख, लता हुलके व वर्षा वाकुडकर यांचे योगदान लाभले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!