जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा

0
97

दिनेश मंडपे 
नागपूर जिल्हा प्रतिनिधी

शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटेने तर्फे दि ३,डिसेंबर, शुक्रवार रोजी मधुरम ,सभागृह विदर्भ हिदी साहित्य संमेलन सीताबर्डी येथे जागतिक अपंग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. सिध्दार्थ गायकवाड प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण विभाग तर उद्घाटक म्हणून योगेश कुंभेजकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे होते तसेच विशेष निमतीत्र म्हणून डॉ. संजय जयस्वाल उपसंचालक आरोग्य सेवा, डॉ कमल किशोर फुटाणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, चितामन वंजारी, शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद,किशोर भोयर, जिल्हा समाकल्याण अधिकारी हे होते यावेळी कर्तुत्ववान, सेवानिृत्त सभासद व 8 कोविड योध्याचा सत्कार तसेच  5 बेरोजगार दिव्यांगांना शिलाई मशीन वितरण करण्यात आले तसेच कोरोना काळयात उत्कृष्ठ काम करणाऱ्या दीव्याग बाधवाचा व 14 सेवानिवृत्त दिव्यांग बांधवांना या वेळी सन्मानित करण्यात आले या वेळी मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here