Homeनागपूरक्रिप्टोकरंसी म्हणजे काय?

क्रिप्टोकरंसी म्हणजे काय?

दिनेश मंडपे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी

क्रिप्टोकरंसी शब्द अलीकडे फारच लोकप्रिय झालेला आहे. त्यामागे कारणे हि तशीच आहे. क्रिप्टोकरंसी म्हणजे आभासी चलन. असे चलन ज्याने आपण ऑनलाईन व्यवहार करू शकतो. परंतु ज्याप्रमाणे  रुपया किंवा कागदी चलनाला स्पर्श करू शकतो, तसा स्पर्श या चलनाला करता येत नाही. म्हणून या चलनाला व्हर्चुअल चलन किंवा डिजिटल चलन असेही म्हटले जाते. क्रिप्टोचलन ऑनलाईन असून ब्लॉकचैन प्रणाली तंत्रज्ञानाद्वारे व्यवहार केले जातात. या चलनाची सुरुवात २००९ मध्ये झाली आहे.

चलनाची उत्क्रांती

सुरुवातीच्या काळात कोणतेही चलन नसल्याने त्यावेळी वस्तू विनिमय पद्धतीचा वापर करून व्यवहार केले जात असत. परंतु कालांतराने एका वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तूंशी करणे कठीण होऊ लागल्याने सोनं या धातूचा वापर चलन म्हणून होऊ लागला. नंतर अनुक्रमे धातूची नाणी, कागदी चलन, प्लास्टिक पैसा म्हणजे डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड आणि इलेक्ट्रोनिक्स पैसा-युपीआय यांद्वारे व्यवहार होत आहे. लवकरच ब्लॉकचैन तंत्रज्ञानावर आधारित “फिंगो पे” म्हणजे आपल्या बोटांच्या सहाय्याने व्यवहार करण्याचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. यापुढील डिजिटल चलन म्हणजे क्रिप्टोचलन.

ब्लॉकचैन तंत्रज्ञान

ब्लॉकचैन प्रणाली माइनिंग तंत्रज्ञानावर विकसित असल्याने यामध्ये दर सेकंदाला “डाटा” चे विकेंद्रीकरण होतात. त्यामुळे क्रिप्टोचलनाद्वारे करण्यात येणारे सर्व व्यवहार सर्वात सुरक्षित आणि पारदर्शक आहे. हैकर यांना हैक करू शकत नसल्याने ब्लॉकचैन तंत्रज्ञानाला संपूर्ण विश्वाने स्वीकारले आहे. माइनिंग करणाऱ्याना माइनर्स म्हटले जाते. क्रिप्टोकरंसीची निर्मिती आणि त्यांचे व्यवहाराला पूर्ण करण्याचे कार्य माइनर्स करीत असतात. यांना मोबदला सुद्धा त्याच क्रिप्टोकरंसी स्वरुपात दिला जातो. भारतात काहीनी माइनिंगची मशीन घेऊन माइनिंग सुरु केले होते परंतु त्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज लागत असल्याने अखेर माइनिंग बंद केले. विजेची खपत कमी करण्यासाठी शीत प्रदेशात माइनिंग केली जातात.

बिटकॉईनची उत्क्रांती

जग बदलविणारे नेहमीच नवीन करण्याच्या प्रयत्नात असतात. सर्व देशांची वेगवेगळे चलन आहे. संपूर्ण विश्वाला एकच चलन देण्याचा विचार जापान देशाचे नागरिक सतोशी नाकामोटो यांच्या डोक्यात आला. सतोशी नाकामोटो  यांनी २००९ मध्ये बिटकॉईनचा शोध लावला. यामुळे त्यांना बिटकॉईनचे जनक मानले जातात. सर्वच देशांमध्ये स्वताचे चलन मजबूत करण्याची स्पर्धा लागली आहे. स्वताच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने  त्यांनी स्वताची ओळख अज्ञात ठेवली आहे. आजपर्यत ते कधीच समोर आले नाहीत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांकडून तेच सतोशी नाकामोटो असल्याचा दावा वेळोवेळी केला जातो. परंतु आजपर्यंत या बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी च्या खऱ्या निर्मात्याचा पत्ता लागू शकलेला नाही. आज अनेक निर्माते या बिटकॉईन ला अधिक सुरक्षित आणि मजबूत बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बिटकॉईनची सुरुवात करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे चलन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कोणत्याही तृतीय पक्षाच्या किंवा कोणत्याही सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय पाठवणे हा होता. जगभरात यासाठी लागणारे सॉफ्टवेअर्सही तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे हे चलन पूर्णपणे विकेंद्रित आहे. तसेच फारच पारदर्शकता सुद्धा असल्याचे हे चलन जलद लोकप्रिय झाले आहे. बिटकॉईनची संख्या केवळ २ करोड १० लाख इतकीच असून आतापर्यंत १ करोड ८८ लाख ९० हजार ६८१ बिटकॉईन माइनिंग झाले आहे. शेवटचा बिटकॉईन २०४० या वर्षी माइनिंग होणार असल्याची शक्यता आहे. आज बिटकॉईन हे वैश्विक चलन झाल्याने संपूर्ण जग हे जागतिक गाव झाले आहे.

क्रिप्टोकरंसीचे प्रकार

संपूर्ण जगात क्रिप्टोकरंसीची संख्या १५,१७२ इतकी आहे. क्रिप्टोकरंसी दोन प्रकारची आहे. ज्या क्रिप्टोकरंसीची स्वताची ब्लॉकचैन प्रणाली आहे त्यांना कॉईन संबोधले जाते. बिटकॉईन, इथेरीयम, बिनांस कॉईन, कार्डानो, ट्रोन इत्यादी प्रसिद्ध क्रिप्टोकरंसी कॉईन आहे. तर ज्या क्रिप्टोकरंसीची स्वतची ब्लॉकचैन प्रणाली नाहीत त्यांना टोकन संबोधले जातात. शिबा इनू, विंक, बिटीटी इत्यादी टोकन आहे. मैटीक टोकन हे भारतीय क्रिप्टोकरंसी असून संदीप नईलवाल यांच्या मालकीचे आहेत. कोरोना काळात देशाला क्रिप्टोकरंसी स्वरुपात सुमारे २००० कोटी रुपयांचे दान प्राप्त झाले असून त्याच्या प्रबंधनाचे कार्य संदीप नईलवाल करीत आहे.

क्रिप्टोकरंसी कायदेशीर की बेकायदेशीर

सध्या आपल्या देशात क्रिप्टोकरंसी कायदेशीर नाही आणि बेकायदेशीर सुद्धा नाहीत. सोन्याप्रमाणे त्याला “असेट” चा दर्जा आहे. सध्या भारतात अंदाजे 3 करोड पेक्षा जास्त क्रिप्टोकरंसीचे गुंतवणूकदार असून सहा लाख करोड रुपयांची गुंतवणूक असल्याची आकडेवारी समोर आली आहे. भारत सरकार संसदेच्या चालू हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरंसी नियमित विधेयक २०२१ ठेवणार आहेत. खाजगी क्रिप्टोकरंसीला प्रतिबंधित करून क्रिप्टोकरंसी एक्सचेंजना सेबी च्या अधिनियमात आणणार असल्याची चर्चा आहे. यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात कराद्वारे नफा प्राप्त होणार आहे

क्रिप्टोकरंसी एक्सचेंज

क्रिप्टोकरंसीची खरेदी-विक्री करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या संकेतस्थळ किंवा प्लेटफॉर्म ला एक्सचेंज म्हटले जातात. शेअर मार्केट प्रमाणे क्रिप्टोकरंसी मध्ये सुद्धा ट्रेडींग सुरु झालेली आहे. क्रिप्टोकरंसी ट्रेडींग मार्केट २४ तास ७ दिवस आणि वर्षभर सुरु असतात. त्यामुळे अनेकांनी क्रिप्टोकरंसी ट्रेडींग ला पसंत केलेले आहे. तसेच यामध्ये ट्रेडींग करणे फारच सोपी आहे. ट्रेडींग करतांना फार जाचक अटी नसल्याने क्रिप्टोकरंसी ट्रेडींगमध्ये ट्रेडर्सची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. हल्ली  क्रिप्टोकरंसी एक्सचेंज ची संख्या ४३६ असून यातील काही एक्सचेंज आंतरराष्ट्रीय असून काही त्या देशापुरते मर्यादित आहे. तसेच काही एक्सचेंज केंद्रित तर काही विकेंद्रित आहे. बिनांस हे जगातील प्रथम क्रमांकाचे क्रिप्टोकरंसी एक्सचेंज असून देशात ७ क्रिप्टोकरंसी एक्सचेंज आहे.

रोबोट तंत्रज्ञानाद्वारे ट्रेडींग

सध्याचे युग हे रोबोट चे युग आहे असे म्हटले जाते. कृत्रिम गुणवत्तेचा वापर सर्वच क्षेत्रात सुरु झाला आहे. याचा वाईट परिणाम मोठ्या प्रमाणात रोजगारांवर झालेला आहे. स्वयंचलित रोबोट मशीनद्वारे वस्तूंची निर्मिती प्रक्रिया सोपी, सुबक, जलद झाली आहे. आता याच रोबोटिक तंत्रज्ञानाचा आणि कृत्रिम गुणवत्तेचा वापर क्रिप्टोकरंसी ट्रेडींग मध्ये होऊ लागला आहे.याकरिता मोबाईल रोबोटिक अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. हे अप्लिकेशन एक्सचेंज ला API लिंकद्वारे जोडून 24 तास ट्रेडींग करणे फारच सोपी झाले आहे. ट्रेडींगमध्ये जोखीम असल्याने अनेकजण  ट्रेडींग करीत नाही. परंतु रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे ट्रेडींग केल्यास केवळ नफा मिळतो तसेच कोणतेही नुकसान होत नाही हे सिद्ध झाले आहे. रोबोट तंत्रज्ञानाद्वारे ट्रेडींग करणाऱ्यांची संख्या देशात अंदाजे २-3 लाख असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

लेखक क्रिप्टोकरंसी अभ्यासक व प्रशिक्षक आहेत
– निकेश पिने 

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!