Homeगडचिरोलीगोवाशांसह 59 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त

गोवाशांसह 59 लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली : गोवंशाची तस्करी करणाऱ्यांचा गड़चिरोली तिल गोरक्षकांच्या मदतीने,गुप्त माहिती च्या आधारा वर वरिष्ठ पोलिस अधिकारींचा आदेशा मुळे पोलिस विभागाने गोवंशाची तस्करी करणांर्याचा पर्दाफाश केला आहे.

पेंढरी पोलिसांनी 6 वाहनांसह 59 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई आज, 21 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास पेंढरी येथे केली. याप्रकरणी एकूण 8 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 जणांना अटक करण्यात आली आहे तर तीन जण फरार झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, छत्तीसगड राज्यातून जवळपास 145 गोवंश वाहनांमध्ये डांबून तेलंगणा राज्यातील कत्तलखान्यात नेण्यात येत होते. यासंदर्भात गोरक्षकांकडून गुप्त माहिती मिळताच पेंढरी पोलिसांनी सापळा रचून गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनांना पकडले. या कारवाईत 7 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या 90 गायी व 3 लाख 60 हजार रुपये किंमतीचे 45 बैल असे एकूण 135 गोवंश व 49 लाख रुपये किंमतीचे 6 वाहने असा एकूण 59 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात पेंढरी पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, पोलिसांना बघताच ट्रक मधील तस्करांनी वाहने सोडून जंगल परिसरात पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून 5 तस्करांना अटक केली. परंतु 3 तस्कर जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांनतर पोलिसांनी गोवंशाने भरलेले 6 वाहन पोलिस ठाण्यात जमा केले. अवैध गोवंश तस्करीची मोठी कारवाई केल्याने गोवंश तस्करांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे. सदर कारवाई पेंढरी उपपोस्टेचे प्रभारी अधिकारी पोउपनि सागर पेंढारकर, पोउपनि मनोज बरूरे, पोहवा मडकाम, पोशी विनय, भीमराव, पेंदाम यांनी केली. अधिक तपास पोउपनि धम्मदीप काकडे करीत आहेत

अटक व फरार आरोपींची नावे

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 5 आरोपींमध्ये अब्दुल समीर जहीर शेख (26) रा. राजुरा जि. चंद्रपूर, पुनित अनिल चतुर (26) रा. आष्टी ता. चामोर्शी जि. गडचिरोली, रमेश पेंटू रेकलवार (36) रा. वाकडी जि. आसिफाबाद (तेलंगाणा), जमीर शेख दस्तगीर (32) रा. गोयेगाव ता. वाकडी जि. आसिफाबाद (तेलंगाणा), सखा सल्ला खॉन (42) रा. अेरगावन ता. राजूरा जि. चंद्रपूर यांचा समावेश आहे. तर फरार 3 आरोपींमध्ये रवी नैताम रा. चंद्रपूर, दरुण शेख रा. आरीफाबाद व तरुण हलदर रा. छत्तीसगड यांचा समावेश आहे. सर्व आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामीण भागात सर्रास तस्करी काही महिन्यांपूर्वी एलसीबीने जिल्ह्यात गोवंश तस्करीविरोधात मोठी कारवाई करीत लाखो रुपयांचे वाहन जप्त केले होते. तसेच लाखो रुपये किंमतीच्या गोवंशाला जीवनदान देण्यात यश आले होते. सोबतच जिल्ह्यातील विविध ठिकाणी गोवंश तस्करांवर कारवाई केली जात आहे. परंतु गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात गोवंश तस्करीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही. जिल्ह्यात गोवंशाची संख्या अधिक असल्यामुळे तेलंगणासह इतर राज्यातील तस्कर याच जिल्ह्यातून गोवंश तस्करी करतात. यामुळे जिल्ह्यात गोवंश तस्करीचा सिलसिला सुरूच आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!