जीवन गौरव समुहातर्फे खुर्शिद शेख यांचा सत्कार…

0
340

गडचिरोली: खुर्शिद शेख यांना भारत सरकारचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जीवन गौरव समुहातर्फे सपत्नीक जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उके मॅडम मुख्याध्यापिका जि.प.उ.प्रा.शा.नेडेंर व सलुजा मॅडम , पदवीधर शिक्षिका जि.प.उ.प्रा.शा.खमनचेरू  तसेच , जीवन गौरव मासिकाच्या सहसंपादीका सिता टेकूलवार,जि.गडचिरोली यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

खुर्शिद शेख हे जीवन गौरव चे वाचक सभासद आहेत. वाचन-लेखन चळवळीमध्ये शेख सरांचे खूप मोठे काम आहे असे प्रतिपादन अध्यक्ष मु.अ.उके मँडम यांनी केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की,केंद्र शासनाच्या वतीने 2021 चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देशातील 44 शिक्षकांना जाहीर केला आहे. यात महाराष्ट्रातील 2 शिक्षकांची निवड झाली आहे. यात आदीवासी विभागातून एकमेव शिक्षक म्हणून गडचिरोलीचे खुर्शिद शेख सर यांना हा बहुमान मिळाला आहे. अगदी कमी वयात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे एकमेव जिल्हा परिषदेचे गुरुजी आहेत.असे बोलून शेख सराचे  तोंडभरून कौतुक केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन गौरवच्या सहसंपादीका सिता टेकूलवार यांनी केले तर आभार श्रद्धा मॅडम यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय उके मॅडम मुख्याध्यापिका जि.प.उ.प्रा.शा.नेडेंर व आदरणीय सलुजा मॅडम, पदवीधर शिक्षिका  जि.प.उ.प्रा.शा.खमनचेरू तसेच टेकुलवार मॅडम, जीवन गौरव मासिक , सहसंपादीका जि.गडचिरोली , श्रद्धा मॅडम, श्री काडबाजीवार  सर  तसेच इतर जीवन गौरव समुहाचे सदस्यंनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here