HomeBreaking Newsताडोबात वाघिणीने केले महिला वनरक्षकाला ठार...

ताडोबात वाघिणीने केले महिला वनरक्षकाला ठार…

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा वन परिक्षेत्रात शनिवारी सकाळी एका वाघिणीने महिला वनरक्षिकेला ठार केले. या घटनेने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

या महिला वनरक्षकेचे नाव स्वाती ढुमणे असे आहे. स्वाती आणि इतर तीन वनकर्मचारी ट्रान्झॅक्ट लाईनचे काम करत असताना ही घटना घडली. ट्रान्झॅक्ट लाईनचे काम सुरु असताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना ‘माया’ ही वाघीण दिसली.

वाघीण ते ठिकाण सोडेल म्हणून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे अर्धा तास वाट पाहिली. मात्र माया वाघीण जाण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसल्याने स्वाती ढुमणे यांनी कामगारांसोबत दुसऱ्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. कामगार जात असताना माया त्यांच्या मागे धावली. वनरक्षकाला वाचवण्यासाठी कामगार प्रयत्न करत असताना मायाने स्वातीवर हल्ला केला. माया वाघिणीने त्यांना जंगलात ओढत नेले आणि मारले. हे दृश्य पाहून सफारीसाठी आलेले पर्यटक घाबरले.

ही सर्व घटना परिक्षेत्र वन अधिकारी प्रदीप चौहान यांना कळताच ते घटनास्थळी पोहोचले. स्वातीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूरच्या रुग्णालयात नेला आहे. याप्रकरणी वनपाल अधिक तपास करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य वनरक्षक आणि प्रवर्तित वनपाल युनियनचे अध्यक्ष अजय पाटील यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक यांना निवेदन सादर करून अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कर्मचारी पाठवताना योग्य मनुष्यबळ मिळावे, अशी विनंती केली आहे.

भविष्यात. सुरक्षेशिवाय कामकरण्यासाठी भाग पाडल्यास युनियन अशा कोणत्याही घटनेसाठी व्यवस्थापनाला जबाबदार धरेल, असे या निवेदनात म्हंटले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!