चाईल्ड लाईन (१०९८) तर्फे बालकदिनाच्या निमित्ताने कपडे आणि खाऊ वाटप…

0
45

नागपूर: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या बालकदिनाचे औचित्य साधून चाईल्ड लाईन (1098) तर्फे हजारी पहाड नागपूर येथे लहान बालकांना कपडे आणि खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी मेघा मालानी (जनता जिनी सोशल ग्रुप), मेनका भार्गव (NCM), चाईल्ड लाईनच्या मिनाक्षी ढढाडे, रुचिता मेश्राम( नगरसेविका), वैशाली फरखांडे, शाळा सहाय्यक गायत्री सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुहास चालूरकर, अनिकेत भिवागडे, आदर्श टेकाम, भावना कोवाचे, आचल तरांडे, प्रिया वानखेडे, दिपाली गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here