गोंडपिपरी तालुक्यात परिसरात विजेचा लपंडाव सुरू भर उन्हाळ्यात विजेचा लपंडाव; नागरिक उकाड्याने हैराण

458

गोंडपिपरी :- गोंडपिपरी परिसरात नदंवर्धन येथे सुपगांव, धामणगांव, दरूर,अडेगांव, चेकदरूर, विजेचा लपंडाव सुरु आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यातच कधी दिवसा, तर कधी रात्री अचानक वीज गायब होत आहे.

वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. दररोज पधरा मी ते अधा तासाला किवा वारंवार विद्युत् पुरवठा खंडित होत असतो.वातावरण खराब असो किंवा नसो विद्युत पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे परीसरातील नागरीकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

ही बाब अतिशय गंभीर असून ग्राहकांना सुरळित विद्युत पुरवठा करणे महावितरण कंपनीचे काम आहे.
तरी परीसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा व विद्युत ग्राहकांना चांगली सुविधा द्यावा करीता जर सदर मागणीची दखल घेऊन विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत केला गेला नाही तर गांवकरी आक्रमक पवित्रा घेणार व महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे माध्यम प्रतिनिधिस सांगितले.