धान खरेदी केंद्रावरील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही – आमदार डॉ देवराव होळी

0
203

गडचिरोली:- दि. 12 नोहेंबर महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन गडचिरोली द्वारा संचालित कृषी औद्योगिक खरेदी विक्री तथा प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित कुरखेडा च्या सहकार्याने गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान खरेदी केंद्राचे उदघाटन आज रोजी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. या निमत्याने आमदार डॉ देवराव होळी यांनी सदिच्छा भेट दिली व सविस्तर माहिती जाणून घेतले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक खेमनाथजी डोंगरवार, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष व्यंकटी नागीलवार, मुख्य प्रशासक प्रभाकरराव वासेकर, संघाचे उपाध्यक्ष तथा भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, उद्धवजी गहाणे, जीवन मेश्राम, आनंदराव जांभुळकर, व्यवस्थापक सुधाकर वैरागडे, लाकडे, व अन्य संस्थेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.याप्रसंगी आमदार डॉ देवराव होळी यांनी प्रशासक यांच्या कडून सविस्तर माहिती जाणून घेतले धान खरेदी करण्यात व्यत्यय येऊ नये याकरिता काळजी घेण्यासाठी निर्देश दिले व गोरगरीब शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घ्यावा असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here