काँग्रेस पक्षाचे चंद्रपुर शहर प्रभारी किशोर गजभिये चंद्रपुर दौऱ्यावर…

0
88

चंद्रपुर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने चंद्रपूर शहर प्रभारी म्हणून नुकतीच किशोर गजभिये यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर किशोर गजभिये पहिल्यांदा जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात त्यांनी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आयोजित केली आहे.

चंद्रपुर महानगरपालिका निवडणूक लक्षात घेता ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत निवडणूकीबद्दल विचारमंथन होऊन पुढील रणनीती पक्ष तयार करू शकतो. त्यामुळे सर्व पदाधिकारी यांनी या बैठकीला उपस्थित राहणे अनिवार्य आहे. म्हणून बैठकीला आवर्जून उपस्थित राहण्यासाठी रितेश तिवारी (चंद्रपूर शहर अध्यक्ष) यांनी पदाधिकाऱ्यांना आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here