नियोजित कालावधीत अपूर्ण कामे व निकृष्ट दर्जेचा काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कार्यवाही करा-आमदार डॉ देवरावजी होळी…सार्वजनिक बांधकाम विभागाचा आमदार डॉ देवरावजी होळी यांनी घेतला आढावा.. कंत्राटदारांकडून रस्ते व ईतर कामे वेळेत पूर्ण करून घ्यावे न करणाऱ्यास काळया यादीत टाका.

0
54

गडचिरोली:- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येणारी कामे नियोजित कालावधीत पूर्ण होत नसल्याने शासनाचे फार मोठे नुकसान होत असून जनतेलाही त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे कंत्राटदारांकडून रस्ते व ईतर बांधकामाची कामे वेळेत पूर्ण करून घ्यावे मात्र नियोजित कालावधीत चांगले व दर्जेदार काम न करणाऱ्या कंत्राटदारांवर कार्यवाही करावी व वेळेत काम न करणाऱ्या कंत्राटदारांना काळया यादीत टाकावे असे निर्देश गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत दिले.

बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ व २ चे कार्यकारी अभियंता, उप अभियंता यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ व २ अंतर्गत चालणाऱ्या विविध कामांचा आढावा घेतला. निकृष्ट व दर्जाहीन कामांची तातडीने चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. बरीच कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. काम वेळेत होत नसल्याने त्याचा दरवर्षी शासनाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते सोबतच जनतेलाही त्रास होतो त्यामुळे अशा नियोजित कालावधीत व दर्जेदार काम न करणाऱ्या कंत्राटदारांवर कार्यवाही करावी असे निर्देश आमदार डॉ देवराव जी होळी यांनी बैठकीत दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here