जंगली हत्तींकडून झालेल्या नुकसानीची भरपाई द्या…

0
220

 

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच परराज्यातून आलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने हैदोस घातला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके या कळपाने उद्धवस्त केली. त्यातच एक शेतकरी हत्तीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. त्यामुळे शासनाने वेळीच उपाययोजना करून हत्तींच्या कळपाचा बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, तसेच गंभीर झालेल्या शेतकऱ्यास तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आ. डॉ. देवराव होळी यांनी केली.गडचिरोली जिल्ह्यात परराज्यातून आलेल्या ३० ते ४० रानटी हत्तींच्या कळपाने तांडव माजविला असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.हत्तींच्या कळपाने येरकड परिसरातील पिकांची प्रचंड नासधूस केली.

आपल्या पिकांची नासाडी होताना पाहून हत्तींना हाकलून लावण्यास गेलेले शेतकरी अशोक मडावी यांच्यावर हत्तींनी प्राणघातक हल्ला केल्याने ते गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. वाघांच्या दहशतीनंतर आता हत्तींची दहशत वाढली आहे..शासनाने योग्य वेळी हत्तींचा बंदोबस्त केला नाही, तर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. त्यामुळे तातडीने उपाययोजना करून हत्तीच्या कळपाचा बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्तांना, गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आ.डॉ. देवराव होळी यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here