Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील वनजमिनीवर अतिक्रमण केलेल्या आदिवासी व गैरआदिवासी वनहक्क धारकांना वनहक्क पट्टे...

गडचिरोली जिल्ह्यातील वनजमिनीवर अतिक्रमण केलेल्या आदिवासी व गैरआदिवासी वनहक्क धारकांना वनहक्क पट्टे द्या.. जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून मागणी.

गडचिरोली / चक्रधर मेश्राम

गडचिरोली जिल्हयात अनेक वर्षापासून वन जमिनीवर आदिवासी व गैरआदिवासी नागरिक अतिक्रमण करुन शेती करीत आहेत. मात्र त्यांना अदयापही वनपट्टे वितरीत करण्यात आले नाही त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. करीता जिल्हयातील सन २००५ पूर्वीपासून वनजमिनीवर अतिक्रमण केलेल्या आदिवासी व गैरआदिवासी वनहक्क धरकांना सरसकट वनहक्क पट्टे देण्यात यावे अशी मागणी जि.प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी नगरविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. गडचिरोली जिल्हा हा अतिसंवेदनशिल नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल जिल्हा आहे. या जिल्हयामध्ये अनेक वर्षापासून वन जमिनीवर अतिक्रमण करुन घरे बांधून तथा शेतीविषयक व्यवसाय करुन आपले व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांना शेतीशिवाय दुसरा कोणताही व्यवसाय नसून त्यांच्या कुटुंबाचे एकमात्र साधन शेती आहे. जिल्हयात अनेक वर्षापासून आदिवासी व गैरआदिवासी नागरिक अतिक्रमण करुन शेती करीत आहेत. त्यांना अदयापही वन पट्टे वितरीत करण्यात आले नाही. सदर वनपट्टे वाटपाकरीता अतीक्रमण ई पुरावा, पीओआर पावती, तिन पिढयांचे पुराव्याचे हि अट वनपट्टे वितरीत करण्याकरीता घालण्यात आली आहे. परंतु गडचिरोली जिल्हयातील काही भागातील वन विभाग कार्यालय नक्षल्यांकडून जाळपोळ झाल्याने पुरावे उपलब्ध होवू शकत नाही करीता सदर घालण्याता आलेली अट शिथील करून वडिलधाऱ्या मानसांच्या बयानावरुन आदिवासी व गैरआदिवासी वनहक्क धारकांना सरसकट वनपट्टे उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी जि.प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी नगरविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनातून केली आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!