‘माझ्या भीमाच्या नावानं ,कुंकू लावील रमान् ‘ तृतीयपन्थी निधीच्या नृत्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध…..

0
997

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )

सामाजिक बांधिलकीची जाणीव बाळगणार्या तृतीयपन्थी निधीने ‘माझ्या भीमाच्या नावानं ,कुंकू लावीन रमाणं’या प्रसिद्ध गीतावर केलेल्या नृत्याने प्रेक्षक अक्षरशा मंत्रमुग्ध झाले.काही हळव्या स्वभावाच्या स्त्री/पुरुष प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रुही तरळले। !
बौद्ध महासभा शाखा विठ्ठलवाडा येथे १४ नोव्हेंबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
तहसीलदार के डी मेश्राम यांनी या कार्यक्रमाचे उदघाटन केले. मान्यवरांनी समयोचित् विचार व्यक्त केले.
तदनन्तर् मौजा चकपिपंरी येथील रहिवाशी तृतीयपन्थी निधी चौधरी हिच्या नृत्याचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या प्रचंड उपस्थितीत.’माझ्या भीमाच्या नावान् ,कुंकू लावील रमाणं ‘या प्रसिद्ध गीतावर निधीने केलेल्या साभिनय नृत्याने प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.
काही हळव्या प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रूही तरळले !
नृत्याची उत्तम जाण असलेल्या निधीचा मुद्राभिनय आणी पदन्यास् काबिले तारिफ् होता.सदर नृत्याने प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतले ! नृत्याची कोरिओग्राफि तीने स्वतःच केली होती.
समाजाच्या अध्यक्षा सौ दर्शना दुर्गे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.अनिकेत दुर्गे यांनी कार्यक्रमाचे संचलन केले.
कार्यक्रमाला बौद्ध उपासक ,उपासिका , गावतिल् इतर मंडळी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here