Homeगडचिरोलीतीन सख्या बहिणी पडल्या एकाच मुलाच्या प्रेमात… ? प्रेम मिळवण्यासाठी त्या...

तीन सख्या बहिणी पडल्या एकाच मुलाच्या प्रेमात… ? प्रेम मिळवण्यासाठी त्या युवका सोबतच…? आंधळे प्रेमात फसगत झाली.

चक्रधर मेश्राम – सहसंपादक

गडचिरोली :-प्रेम हे आंधळ असत, जे प्रेमात पडतात त्यांच्यासमोर कितीही मोठी अडचण त्यांना लहान वाटते मग योग्य की, अयोग्य विसरून ते त्याच्या हृदयाचे ऐकतो, परिणाम काहीही असो. अशीच एक घटना रामपूरमध्येही समोर आली आहे. इथे तीन सख्ख्या बहिणींचं एकाच तरुणावर प्रेम जडलं. पण त्यांचं हे प्रेम फार काळ लपून राहिलं नाही. कुटुंब आणि समाजात हे प्रेम प्रकरण समोर आल्यानंतर त्यांना विरोध झाला. पण प्रेमात आंधळ्या झालेल्या तिन्ही बहिणींनी ऐकलं नाही. समाज आणि कुटुंबाची चिंता सोडून तिन्ही बहिणी युवकासोबत घर सोडून पळाल्या.

प्रेमाची ही अजब कहाणी उत्तर प्रदेशातील अजीमनगर पोलिस ठाण्याच्या परिसरातील आहे. जवळपास एक आठवड्यापूर्वी एका गावातील तीन सख्ख्या बहिणी घरात कुणालाही काहीही न सांगता निघून गेल्या. अचानक तिन्ही मुली बेपत्ता झाल्याने कुटुंबीय आणि नातेवाईक घाबरले. त्यांनी गाजावाजा न करता आधी आपल्या परिने मुलींचा शोध सुरू केला.

नातेवाईकांकडे तपास केला. पण ओळखीच्या व्यक्तींकडे तपास केला, पण त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. पण या प्रयत्नात अखेर गावात आणि पंचक्रोशित ही बातमी पसरली. यानंतर वेगवगेळ्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चांनी प्रेमाच्या अजब कहाणीलाही जन्म दिला.
बेपत्ता असलेल्या तिन्ही बहिणी या एका युवकासोबत पळून गेल्या, अशी चर्चा आहे. यातील एक बहिणी ही अल्पवयीन आहे. तिन्ही बहिणी एकाच युवकासोबत पळून गेल्याने गावकरीही चकीत झाले आहेत. दुसरीकडे त्यांचे कुटुंबीय अजूनही त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांना अद्याप या घटनेची माहिती देण्यात आलेली नाही. तीन बहिणी बेपत्ता झाल्याची कुठलीही तक्रार कुटुंबीयांकडून अद्याप आलेली नाही. पण त्यांनी तक्रार दाखल केल्यास पोलिस त्यांना नक्कीच मदत करतील, असं अजीमनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी रविंद्र कुमार यांनी सांगितलं.

कुटुंबीयांना याची माहिती मिळताच सर्वांनी खूप तपास केला, पण कोणताही सुगावा लागला नाही. सुरुवातीला लाजून वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली नाही, पण हार मानल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!