संशोधन कार्यातील खळखळून वाहणारा तारूण्यमय झरा टि.टि.जूलमे

0
107

चंद्रपुर: इतिहासाची आवड माझ्या मनात जागृत झाली.पुस्तकांचा अभाव,माहीतीचा अभावामुळे माझा पार गोंधळ उडाला होता.मी चंद्रपूरातील इतिहास अभ्यासकांची नावे शोधू लागलो.माझा विषय चांदागडातील बुध्द धम्माचा इतिहास होता.अश्यात माझ्या जवळचा मित्रांनी,माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी मला टि.टि.जूलमे सरांचे नाव सूचविले.मि त्यांचा फोन नंबर शोधला आणि त्यांचाशी संपर्क साधला.ते म्हणाले मी तूझे नाव ऐकले आहे.इतिहास संशोधन तसा दुर्लक्षित विषय.खरे तर आपल्या समाजातील बुध्दीवंतानी या विषयाकडे गांभीर्याने बघायला हवे.मात्र तसे होतांना दिसत नाही,हे दुदैव.तुझ्यासारखा तरूण या विषयाकडे वढला,हे अभिनंदनीय आहे.

चंद्रपूरचा इतिहास संशोधानात मोठे नाव असलेल्या जूलमे सरांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती.त्यामुळे माझा उत्साह वाढला होता.सरांची प्रत्यक्ष भेट घेण्याची ओढ लागली.दोन-अडीच वर्षापुर्वी मी सरांची भेट घेतली.माझ्या सोबत ऐतिहासिक वारसा सवर्धन समितीचे अध्यक्ष अरूण झगडकर,अॕग्रोवनचे धम्मशिल शेंडे होते.सर ज्या खोलीत राहायचे त्या खोलीचा भिंती त्यांना मिळालेल्या सन्मान पत्रांनी झाकोळल्या होत्या.संपुर्ण खोलीत,घरात,कपाटात ऐतिहासिक वस्तू विखूरल्या होत्या.ते घर नव्हतेच,त्यांचे घर म्हणजे ऐतिहासिक वास्तू संग्रालय होते.साधनांचा अभाव असतांनाही सरांनी चंद्रपूरचा भुभाग पालथा घातला.प्रस्तापीतांनी मांडलेले मत खोडुन काढण्यासाठी असंख्य पुस्तके पालथी घातली होती.त्यांनी संशोधनासाठी उपसलेल्या कष्टाची ग्वाही म्हणजे त्यांची पुस्तके.भेटी दरम्यान त्यांनी आयुष्यात घडलेले अनेक चांगले,वाईट प्रसंग सांगितले.पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.साधारणता दोन वर्षापुर्वी ते गोंडपिपरीला आले होते.माझ्या घरी त्यांनी भेट दिली.त्यावेळी त्यांचे वय 82 वर्ष होते.मी शोधलेल्या पुरातत्वीय साईड बघण्याचा त्यांनी आग्रह धरला.त्यांचा सोबतीला सूधिर पुणेकर,सूमेध शेंडे होते.त्या वयातही जूलमे सरांचा उत्साह एखाद्या तरूणाला लाजवेल असा होता.जवळजवळ आम्ही तिन साईड बघीतल्या.यातील दोन. साईड डोंगर भागावर होत्या.सांधेदुखीचा त्रास असतांनाही जूलमे सरांनी डोंगर सर केला.मला मोलाचे मार्गदर्शन केले.

सोमवारला ( 3 आक्टोंबर 2021 ) अकरा वाजता मला पुणेकर सरांचा भ्रमणध्वनी आला.त्यांनी जड आवाजात सांगितले ” सर आपल्याला सोडून गेलेत.” अतिशय धक्कादायक ही बातमी होती.मन सून्न झाले.सरांसोबत घालविलेल्या आठवणी ताज्या झाल्यात.सरांचा जाण्याने इतिहास संशोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.ही पोकळी भरून निघणे शक्य नाही. सरांचा आशिर्वाद आम्हचा सोबतीला सदैव आहे.त्यांचे संशोधनकार्य माझ्या सारख्या अनेकांना इतिहास क्षेत्रात नवेनवे संशोधन करण्याची प्रेरणा देत राहील…!

सारांना भावपुर्ण श्रध्दाजंली

निलेश झाडे ,धाबा
मो.8805375549

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here