गोंडवाना विद्यापीठाच्या उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कारासाठी सुरज चौधरी यांची निवड…

1320

गौरव लुटेआरमोरी तालुका प्रतिनिधी

गडचिरोली – गोंडवाना विद्यापीठांतर्गत दरवर्षी विविध क्षेत्रात विविध पातळ्यांवर नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्काराने सन्मानित करून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो. सन २०२०-२१ गोंडवाना विद्यापीठात उत्कृष्ट कार्याबद्दल ” जीवन साधना गौरव पुरस्कार , उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, बेस्ट कोव्हीड वीर , विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील शिक्षेकत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्थांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावर्षीचा गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार पदव्यूत्तर रसायनशास्त्र विभागात शिक्षण घेणाऱ्या सुरज चौधरी या विद्यार्थ्याला जाहीर झाला आहे. कोंढाळा येथील सरस्वती सार्वजनिक वाचनालयात कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चित्रकला, वकृत्व, सारख्या स्पर्धेचे आयोजन केले जाते. सुरज हा संजिवनी फाऊंडेशनचा जिल्हाध्यक्ष आहे.

अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा धनी असलेला सुरज हा आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशाने नेहमी चमकत असतो. सांस्कृतिक,क्रिडा, राजकीय, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात परिपक्वता ठेवून आपली विचारांची दांडगी काठी सामाजिक कार्यात नवनवीन उपक्रम राबवून लोकांना जागृत करून आजमावत असतो .वडसा तालुक्यातील मुळचा कोंढाळा या गावचा रहिवासी असलेल्या सुरजला सामाजिक कार्याची ओढ तळमळ आहे .समाजाप्रती एकनिष्ठ राहून समाजाच्या हितासाठी जनजागृती करून विविधांगी भूमिका बजावत असतो.पथनाट्यांच्या माध्यमातून ज्वलंत विषयावर पेट धरत प्रयोग सादर करीत समाज जनजागृती करत असतो. स्त्रीभ्रूणहत्या, दारूबंदी, भ्रष्टाचार व महिलांवरील अत्याचारावर आळा घालण्यासाठी पथनाट्याच्या माध्यमातून आपल्या टीमच्या माध्यमातून गावोगावी जावून जनजागृती करत असतो.कोरोणा‌काळात लागलेल्या लाॅकडाऊनच्या काळातसुद्धा शेतकऱ्यांवर आधारीत समाजकार्याचा विडा उचलत व्हिडीओ बनविला..या व्हिडिओ ला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला…कोरोना महामारीच्या काळात समाजसेवा केल्याबद्दल ” कोविडयोध्दा” म्हणून MLA , आमदार साहेबांच्या हस्ते सुरज चा सत्कार करण्यात आला. विविध पातळ्यांवर नाविन्यपूर्ण उपक्रम तो राबवत असतो. कोरोनाच्या भिषण परस्थितीत शाळा बंद असताना वाचनालयात विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे त्याने गिरविले. महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी येथे शिक्षण घेत असताना अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होवून तो आपली कला सादर करायचा . मग ते एकांकिका,ड्रामा,नृत्य,गायन, वक्तृत्व, वा संचालन मिळालेल्या संधीचे सोने करायचा. सुरज ने महाविद्यालय स्तरावर असताना इंद्रंधनुष्य सारख्या राज्यस्तरीय स्पर्धेत आपल्या कलाकौशल्यांना उत्कृष्टपणे वाव दिला . RD परेड मध्ये निवड शिबिरा पर्यंत मजल मारली.NDRF तर्फ घेण्यात आलेल्या आव्हाण कॅम्पमध्ये त्याने विद्यापीठाचे नेतृत्व केलं. आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालय चा सन २०२० २१ चा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कारचा त्याने मान पटकावला.. राष्ट्रीय सेवा योजनेत अतिशय महत्त्वाची जबाबदारी स्विकारत कॅम्पमध्ये उत्तम कार्य पार पाडले त्यामुळे उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार सुध्दा आपल्या नावावर कोरला. आता पुन्हा एकदा आपल्या महाविद्यालयाचा नाव रोशन करत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे… त्यामुळे विविध क्षेत्रातून आशिर्वाद, शुभेच्छांचा वर्षाव सुरज वर होत आहे..