Homeगडचिरोलीगडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाही नक्षलवाद्यांचा मोठा कॅम्प उध्वस्त

गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाही नक्षलवाद्यांचा मोठा कॅम्प उध्वस्त

गडचिरोली:- भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राअंतर्गत छत्तीसगड सीमेलगत असलेल्या अबुजमाड भागातील कोपर्शी व फुलनार जंगल परिसरात नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात सलग तीन चकमकी उडाल्या असून पोलिसांनी नक्षलवाद्यांना पळवून लावत नक्षलवाद्यांचा मोठा कॅम्प उधळून लावला आहे.

भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राअंतर्गत कोपर्शी व फुलनार जंगल परिसरात नक्षलवाद्यांचा मोठा कॅम्प असल्याच्या गोपनीय माहितीवरून नक्षलविरोधी अभियान पथक सी-६० चे जवान अभियान राबविण्यास गेले असतांना रविवारी दुपारी साधरणतः साडेचार च्या सुमारास भामरागड दलमच्या नक्षलवाद्यांनी अचानक अभियान पथकाच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला.

जवानांनी प्रत्युत्तरादाखल नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यांनतर नक्षलवाद्यांनी पळ काढला. जवानांनी पाठलाग केला तेव्हा त्यांनी पुन्हा गोळीबार केला व पळून गेले असाच प्रकार तिसऱ्यांदा घडला. ही चकमक जवळजवळ अर्धा ते पाऊन तास चालली. सी-६० जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळ काढला.

चकमकीनंतर जंगल परिसरात जवानांनी शोध मोहीम राबविली असता घटनास्थळाच्या परिसरात नक्षलवाद्यांचे मोठे शिबीर असल्याचे आढळून आले. या शिबिरात आयईडी, मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य जप्त करण्यात आले. आयईडी जागेवरच नष्ट करण्यात आला. नक्षलवाद्यांची ही मोठी योजना असून ती उधळून लावण्यात यश प्राप्त झाले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!