Homeगडचिरोलीमारकबोडीच्या जंगल परिसरात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू…

मारकबोडीच्या जंगल परिसरात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू…

चक्रधर मेश्राम सहसंपादक

गडचिरोली तालुक्यातील मारकबोडी गावाला लागून असलेल्या जंगल परिसरात मृतावस्थेतील बिबट्या आढळून आला. सदर बिबट्याला मारण्यासाठी कुणी त्याच्या वर विषप्रयोग तर केला नसावा , अशी शंका निर्माण केली जात आहे.
गडचिरोली तालुक्यातील मारकबोडी जंगल परिसरात वनकर्मचारी गस्तीवर असतांना त्यांना बिबट्या मृतावस्थेत दिसून आल्याने , गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्याणी तत्काळ माहिती वनविभाग अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दि.23सप्टेंबर रोजी दुपारी 5 वाजताच्या सुमारास मौका पंचनामा करन्यात आले, सदर जागा ही FDCM खंड 143 मध्ये येतं असल्याने सदर मृत बिबट्यास शवविच्छेदानासाठी ब्रम्हपुरी येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती एफडीसीएम चे वन अधिकारी अदिती भारद्वाज यांनी दिली आहे.
मारकबोडी परिसरात मोठे जंगल आहे. त्यामुळे येथे नेहमीच बिबट्याचा आणि वाघाचा वावर या परिसरात आढळून येत असतो.मात्र बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.
वनविभागा कडून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल अशी माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!