Homeगडचिरोलीवाल्याचा वाल्मिक होऊ शकतो, मग “नक्षलिस्ट”, “नँशनालिष्ट” होऊ शकत नाहीत का. ?...

वाल्याचा वाल्मिक होऊ शकतो, मग “नक्षलिस्ट”, “नँशनालिष्ट” होऊ शकत नाहीत का. ? कैलास शर्मा यांनी व्यक्त केले बिनधास्त विचार…

गडचिरोली सहसंपादक चक्रधर मेश्राम

मुळात , स्वभावतः, कोणताच माणूस गुन्हेगार नसतो, सभोवतालची परिस्थिती त्याला गुन्हेगार बनविन्यास प्रवृत्त करित असते।। शालीनता ,सोज्वळता, सृजनशिलता, सुंदरता,भाऊकता, विनम्रता, या कारणास्तव आपण हे भारतीय, स्त्रीयांचा सन्मान करित असतो.
फुलनदेवी ही सुद्धा भारतीय स्त्री होती. स्त्रीत्वाची सर्व लक्षणे फुलनदेवीत होती. सर्वसामान्य कुटुंबात ती जन्माला आली होती. तीच तारुण्य प्रफूल्लीत होण्या अगोदरच , समाजातील धनदांडग्यांनी , एक अबला संबोधुन फूलनदेवीवर आणि तीच्या कुटुंबियावर अनन्वीत अन्याय आत्याचार केलेत. मांजर ही हा प्राणी सर्वात घाबरट असतो. नुसत्या आवाजाला घाबरुन तो पळून जातो। पण, याच मांजराला आपण घरात कोंडून मारण्याचा प्रयत्न केला तर, तेच घाबरट मांजर , परिस्थितीच भान राखीत आपल्या नरडीचा घोट घ्यायलाही कमी करित नाही.
फुलनदेवी हिच्या नावांतच ,” देवी” असतांना ती अन्याय अत्याचार कसा सहन करील… ? विनाकारण आपल्यावर आणि आपल्या कुटुंबांवर अत्याचार होताच , फूलनदेवी मधील देवीत्व जागृत झालं, न कळत , बदल्याच्या भावनेन फुलनदेवीने, हातात बंदुक घेतली, प्रशिक्षणासाठी ती , गायब झाली आणि प्रशिक्षित होताच , ती प्रकटली आणि अन्याय अत्याचार करणारावर आसूड ऊगवायला लागली….
अन्याय अत्याचार करणारांना धडा शिकविण्यापर्यंत फूलनदेवीचा प्रहार सुयोग्य होता पण , सुड उगविण्याच्या नादात , फूलनदेवी निरापराध पुरुषमंडळीवरही आसूड उगवायला लागली होती. तीच्या अतिरेकि प्रवृतीला लगाम घालण्याचे व तिला माणसात आणण्याचे पुण्य कर्म काही समाज सुधारकांनी केले. सरकारनेही तीला अभय दिले ईतकेच नव्हे तर तीला खासदार होण्याची संधीही दिली.

ब्रिटीश राजवटीत सर्वसामान्य लोकावरील अन्याय अत्याचार करणाऱ्या घटनांना ऊत आला होता. समाजातील धनद़ांडगे खाजगी सावकार, गरजवंत माणसांना हेरुन , त्यांची लुबाडणूक करायचे . गरज भागविण्यासाठी , गोर गरीब या खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यायचेत, पण कर्ज फेडूनही, हे सावकार पैशांच्या जोरावर, त्या गोरगरीबांना देशोधडीला लावत असत. तंट्याभिल नावाचा आदिवासी तरुण पिढी आणि त्याचे कुटुंबिय खाजगी सावकाराखडून असेच नागविले गेले. त्या संतापात तंड्या भिल दरोडेखोर झाला . तो धन दांडग्या खाजगी सावकारांवर दरोडा घालायचा आणि लुटुन आणलेली संपत्ती तो समाजातील गोर गरिबांना वाटून द्यायचा. तंट्या भिल मुळात दरोडेखोर नव्हता , पण सभोवतालच्या परीस्थितीने त्याला दरोडेखोर बनण्यास भाग पाडले होते. नक्षलवादी पंथाची अशीच डोकेदुखी निर्माण झाली आहे. हे नक्षलवादी केव्हा, कुठे, कसा आणि कुणावर प्राणघातक हल्ला करतील हे सांगताच येत नाही. विशेतः पोलीस , सैन्यदल, विकासक, सरकारने कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी हे त्यांचे लक्ष्य असते. या व्यतिरिक्त त्यांच्या संदर्भात शासनाला किंवा पोलिसांना माहिती पुरविणार्याचाही ते गेम करतात. कोण आहेत हे नक्षलवादी… ? समाजातील विविध घटका कडुन नाडले गेलेले,लुबबाडले गेलेले, , अन्याय , आत्याचाराने पिळलेले लोक हे नक्षलवादी पंथात , केवळ बदल्याच्या भावनेने प्रेरीत होऊन सहभागी होतात. माणुसकी त्यांच्यात शिल्लकच रहात नाही, त्यांना दया माया, माहितच नसते. शासनाच्या संदर्भात त्यांच्या मना कमालीचा असंतोष असतो. आपल्यावर अन्याय अत्याचार होण्याला स्वार्थांध शासकीय अधिकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी हेच जबाबदार असल्याने , त्यांचा निष्ठूरतेने बदला घेण्याची अढी त्यांच्या मनात निर्माण झालेली असते , केवळ त्याच हेतूने ते सुनियोजित हिंसाचार करित असतात. अशा प्रकारच्या हिसांचाराने , आपण आपलेच, आपल्या समाजाचे, आपल्या देशाचे नुकसान करतो हे, त्यांच्या लेखीच नसते.
नक्षलवाद्यांच्या दहशतीने त्या परिसरात काम करायला कुणी धजावत नाही,विकासकामांना अडथळा निर्माण होतो,पर्यायाने समाजाचे व देशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. .
नक्षलवाद्याना पकडून त्यांना शिक्षा करुन हा प्रश्न सुटणारा नाही, कारण, स्वभावतःते हिसंक नाही. परिस्थीतीने त्यांना हिसंक बनविले . ती परिस्थिती समजून घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन, त्यांचे पुनर्वासाची सुनियोजित योजना आखुन, त्यांच्यात तसा आत्मविश्वास निर्माण करुन, त्यांना आत्मचिंतनाची संधी उपलब्ध करुन दिली तर , त्यांच्यात निश्चित परिवर्तंन घडून येऊ शकते .त्यासाठी त्यांच्या विश्वासातील मसिहा जन्माला येणाऱ्या गरजेचे आहे. रामायणाची निर्मिती करणारा , वाल्या वाल्मिकी होऊ, शकतो तर, नक्षलीष्ट , नँशनालिष्ट होऊ शकणार नाही का ?

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!