गडचिरोली:
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड़ येथील एका इसमाची नक्षल्यांनी हत्या करून सुरजागड येथिल देवस्थान परिसरातील बोरवेल जवळ बॉडी ठेवले असल्याची घटना समोर आली आहे .
नक्षल्यांनी हत्या करण्यात आलेल्या इसमाचे नाव सोमाजी सडमेक (४५) असे नाव असुन सुरजागड़ येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
नक्षल्यांनी हत्या करण्यात आलेल्या इसमाला रात्रीच्या दरम्यान परिवारा समोर नक्षल्यांनी आपल्यासोबत घेऊन जाऊन सुरजागड मंदिरालगत असलेल्या बोरिंग जवळ हत्या करून बॉडी त्याच ठिकाणी ठेवल्याचे सकाळच्या सुमारास कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना आढळून आल्याने सदर घटनेची माहिती परिवारांना दिल्याची प्राथमिक माहिती आहे .त्यानंतर परिवारानी हेडरी पोलिस मदत केंद्रात माहिती दिली असून सदर बॉडी परिवारासोबत पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
नक्षल्यांनी हत्या करण्यात आलेला इसम पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय असल्याने हत्या केली असावी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गडचिरोली पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईने काही दिवसापासून नक्षल्यांच्या हिंसक कारवाई, चळवळीला मोठा हादरा बसला होता त्यानंतर नक्षल चळवळ ही पूर्णपणे शांत झाल्याचे समोर आले होते .
मात्र अचानकच नक्षल्यांनी सुरजागड येथील इसमाची हत्या करून पुन्हा डोके वर काढल्याचे समोर आले असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .