गडचिरोली वनविभागातर्फे मानव वन्यजीव संघर्ष टाळण्याकरिता गावा गावात जनजागृती…

0
152

गडचिरोली: तालुक्यासह जिल्हयात नरभक्षी वाघाने हल्ला करून दहशत माजवली आहे. नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याचे शर्थीचे प्रयत्नही वनविभागातर्फे करण्यात येत आहे. परंतु नरभक्षी वाघ या सर्वांना हुलकावनी देत आहे. जिल्हाधिकारी यांनी सुध्दा जंगल लगत गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून जंगल परिसरात जाण्यास मज्जाव सुध्दा करण्यात आला आहे.

गडचिरोली वनविभागाचे सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या मार्गदर्शनात जंगल लगत गावागावात विविध उपाययोजना करण्यात येत आहे. वाघ रस्त्यानजीक असलेल्या झुडपी जंगलात लपून असल्यास नागरिकांना दिसेनासे होत त्यामुळे रस्ता नजीकचे झुडपी जंगलाचे कटाई करणे वनविभातर्फे सुरू आहे. त्याचप्रेमाणे गावागावत ॲडीओ क्लीप, बॅनर मधून जनजागृती, पहाटे ४ वाजता पासून गस्त घालने, वाघावर सतत नियंत्रण ठेवणे, दिवभरातील वाघाबाबत माहिती घेणे व सनियंत्रण कक्ष, प्राथमिक बचाव दल आदी उपाययोजना वनविभागतर्फे सुरू आहे. जंगला लगत परिसरातील नागरिकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन वनविगातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here