Advertisements
Home गडचिरोली गडचिरोली शहरातील गटार कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार? उच्चस्तरीय चौकशी होणार का?

गडचिरोली शहरातील गटार कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार? उच्चस्तरीय चौकशी होणार का?

गडचिरोली चक्रधर मेश्राम

Advertisements

गडचिरोली शहरातील अनेक वाडाऀत गटार लाईन चे काम सुरू केले असून फुले वार्डात होत असलेल्या गटार पाईप लाईनच्या कामाच्या चौकशीची मागणी. अनुप मेश्राम यांनी केली आहे. शहरातील सदर कामें करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत , फुले वार्ड क्रमांक 2 मध्ये होत असलेले गटार पाईप लाईनची कामे ही अतिशय निकृष्ट दर्जाचे असून लवकरच भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहेत. कामावर देखरेख करणारे संबंधित ठेकेदाराने गटार पाईप लाईन टाकताना एस्टिमेट प्रमाणे नालीचे खोदकाम केलेले नसून नाली च्या आत मध्ये टाकलेल्या लेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात रेती आणि गीट्टीचा वापर केलेला आहे. नालीचे खोदकाम हे सरळ न करता वाकडे तिकडे आहे त्या स्वरूपात खोदकाम केलेले असून नाली मध्ये गटार पाईप हे दर्जेदार कंपनीचे न वापरता हलक्या दर्जाचे वापरून जनतेची दिशाभुल केली जात आहे. संबंधित गटार पाईपचे कामे करताना होत असलेल्या कामावर नगरपरिषद अभियंत्याचे देखरेख सुद्धा नाही . शहरात आणि फुले वार्डात होत असलेल्या व आतापर्यंत झालेल्या संपूर्ण गटार पाईप लाईन कामाच्या चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनुप मेश्राम यांनी केलेली असून संबंधित ठेकेदाराची देयके रोकण्यात यावे. वार्डात होत असलेले व आता पर्यंत झालेल्या संपूर्ण कामाची उधळपट्टी करून दुसऱ्यांदा नव्याने गटार पाईपचे कामे नव्याने करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनुप मेश्राम यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून केली आहे.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू.. नागरिक संतप्त महामार्गावरील ७-१० ट्रक पेटवले

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी) गडचिरोली: आलापल्ली ते आष्टी ३५३ सी या राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेली महिलेचा जागीच मृत्यू झाला...

गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवाद्यांचा आत्मसपर्पण,माओवाद्यांना मोठा धक्का

गडचिरोली :- विलय दिवसाच्या दिनी माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.दोन जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या दोन्ही माओवाद्यांवर एकत्रितपणे सहा लाखांचे बक्षीस होते. अनिल...

रेगडी-घोट मार्गावर दुचाकीचा अपघात… वनरक्षकसह एक इसम गंभीर जखमी

ब्युरोचिफ प्रशांत शाहा चामोर्शी: तालुक्यातील रेगडी ते घोट मार्गावर आज सकाळी सुमारे 10 वाजता दोन दुचाकीचा समोर समोर जब्बर धडक बसली. या धडकेत बोलेपल्ली येथील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

इंडिया दस्तक न्यूज टीव्ही कार्यालयात हद्द-एक मर्यादा या चित्रपटाचे प्रमोशन…

चंद्रपुर: एस.के.चित्रपट निर्मित "हद्द-एक मर्यादा" हा चित्रपट येत्या 15 ऑक्टो.2022 ला प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहात प्रदर्शित होत आहे. आज आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही...

विशाल शेंडे यांना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार जाहीर

चंद्रपूर: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड केली जाते. सन २०२१-२२ या कालावधीत महाविद्यालयात तसेच इतर क्षेत्रात...

उत्कृष्ट गणेश सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण…विजेत्यांचा सत्कार – आ.वडेट्टीवार यांची सपत्नीक उपस्थिती

सिंदेवाही:  युवक काँग्रेस प्रदेश सचिव शिवानी वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून सिंदेवाही - लोनवाही महिला काँग्रेस कमेटीच्या वतीने गणेशोत्सवा दरम्यान घरगुती गणेशाची उत्कृष्ट गणेश सजावट स्पर्धेचे...

मोबाइलसाठी मुलाने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव…#कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का…

चंद्रपूर : वडीलांनी मोबाईल बघू दिला नाही, या कारणाने एका मुलाने अपहरणाचा बनाव केला. शहरातील एका अकरा वर्षाच्या मुलाला मोबाईलचे प्रचंड वेड. नेहमीप्रमाणे तो...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!