जिवती शहरासह ग्रामीण भागात दारूच्या अवैध धंद्याला ऊत पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष दारू तस्कर शहरासह ग्रामिण भागात सक्रिय

0
64

दिपक साबने,जिवती

जिवती- चंद्रपूर जिल्ह्यात एप्रिल २०१५ मध्ये जिल्हा दारूबंदी घोषित करण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यामध्ये अवैद्य दारूच्या धंद्याला मोठ्या प्रमाणात उत आले होते. सदर काळामध्ये बऱ्याच लोकांनी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून दारू विक्री सुरू केली होती.त्याच प्रमाणात दारूविक्रेत्यावर सुध्दा मोठ्या प्रमाणात गुन्हे देखील दाखल झाले.
दारू विक्रीला मोठ्या प्रमाणात आलेला ऊत आणि त्यातून वाममार्गाला लागलेली तरुणाई, अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळत राज्याच्या तिजोरीत भर घालण्याच्या हेतूने विजय वडेट्टीवार,मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी चंद्रपूर जिल्ह्यांची दारू बंदी उठवली.
दारू बंदी उठवल्यानंतर आता दारू तस्करांनी आपला मोर्चा शहरी भागासोबत मोठ्या प्रमाणात ग्रामिण भागाकडे वळविला आहे. जिवती शहरातील विदेशी देशी दारू दुकानातून अवैधरित्या विनापरवाना दारू साठा दारू तस्कराना दिल्या जात आहे अशी खमंग चर्चा ग्रामीण भागात व जिवती शहरात केल्या जात आहेत.
पोलिस प्रशासनाला काही प्रमाणात अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यात यश आले परंतु ग्रामीण भागातील दारू विक्रेते मात्र जोमात कामाला लागले आहेत. जिवती शहरातील देशी दारू दुकानातुन देशी व विदेशी दारू ग्रामीण भागामध्ये दिवसा व रात्रीच्या सुमारास पोहचवली जाते. तसेच ग्रामीण भागात हातभट्टी जोमात सुरू आहे. जिवती शहरातील विदेशी देशी दारू विक्रेत्या कडे व ग्रामीण भागातील हातभट्टी काढणाऱ्याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. विनापरवाना ग्रामिण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारू साठा पुरवठा केल्याने व ग्रामीण भागातच हातभट्टी काढत असल्याने मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे. पोलिस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले कि काय ? असा प्रश्न तालुक्यातील सुजाण नागरिकांना पडला आहे.अवैध दारू विक्रीवर आळा घालून दारू तस्करांवर कार्यवाही करण्याची देखील मागणी नागरिकांकडून होत आहे.

– नवीन ठाणेदाराकडून अवैध धंद्याना आळा बसणार का?
नुकतेच जिवती पोलीस ठाण्यात जगताप हे नवीन ठाणेदार रुजू झाले असून ते जिवती तालुक्यात चालणाऱ्या अवैध धंद्यांवर आळा घालतील का ? असा सवाल आता सामान्य नागरिकांसह माहिलांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. त्यांच्याकडून अवैध धंद्यांवर आळा घालण्यासोबत चांगल्या कामाची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here