Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयासमोर चारचाकी वाहनाची झाडाला धडक : एकजण जखमी मोठा...

गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयासमोर चारचाकी वाहनाची झाडाला धडक : एकजण जखमी मोठा अनर्थ टळला…

 

गडचिरोली: जिल्हा सत्र न्यायालयासमारे चारचाकी वाहनाची झाडाल धडक बसून अपघात झाल्याची घटना आज १६ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. सदर अपघातात एक जण जखमी झाला असून दुसरा किरकोळ जखमी झाला.

जिल्हा सत्र न्यायालयासमारे असलेल्या झाडाला चारचकी वाहनाची घडक बसली यात एक जण जखमी तर दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. चारचाकी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदर अपघात घडला. सुदैवान झाडाला ठोकर बसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

जिल्हा सत्र न्यायालयात नागरिकांची रेलचेल असते तसेच पुढे अनेक दुकाने सुध्दा आहेत. जर त्याठिकाणी झाड नसता तर वाहन दुकानात शिरले असते व मोठा अपघात झाला असता, सुदैवाने झाड असल्याने मोठा अनर्थ टळला. सदर वाहन चालक हा मद्यधुंद असल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!