चामोर्शी शहराची ट्राफिक जाम होत आहे मुंबई,दिल्ली,कलकत्ता सारखी…

896

ब्युरोचिफ प्रशांत शाहा..

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून ओढकल्या जाणारा चामोर्शी शहर सध्या जिल्ह्यात ट्राफिक जाम मध्ये अव्वल स्थानी असल्याचे दिसत आहे

याचे मुख्य कारण काय हे जाणून घेणे गरजे आहे
आज अचानक इंडिया दस्तक न्युज टीव्हीची टीम चामोर्शी मार्गाने जात असतांना काही दृश्य बघितले ते हैराण करण्या सारखे दृश्य आहे.

गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-सिरोंचा, राष्ट्रीय महामार्ग (353C) चे काम सुरू आहे हे का मागील 2 वर्षापूर्वी पासून सुरू आहे
परंतु चामोर्शी शहरातून जाणारा मार्ग हा फक्त एकच बाजूने बनवला गेला आहे व दुसरी बाजू खोदून ठेवण्यात आले आहे
खोदलेल्या बाजूला चिखलाचे व खड्यांचे साम्राज्य असल्याने सर्व वाहन धारक एकाच बाजून जात आहेत मात्र महामंडळचे बस ट्राफिक मुळे खड्यातून व चिखलातून सुरू आहे.

चामोर्शी शहर हा मोठा व तालुकाचा मुख्य बाजारपेठ असल्याने इथे नेहमीच गर्दी असते. मार्ग एकाच बाजूने सुरू आहे त्यात दोन चाकी,चारचाकी वाहन उभे असतात कारण इथे पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे सध्या चामोर्शी शहरात मुबई, दिल्ली, कलकत्ता सारखी ट्राफिक जाम होत असल्याचे चित्र समोर आहे. या ट्राफिक जाम कडे पोलीस प्रशासन व नगरपंचायत का लक्ष देत नाही हा एक मोठा प्रश्न इथे निर्माण होत आहे