Homeगडचिरोलीरेगडी-विकासपल्ली परिसरात विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त महावितरणचे दुर्लक्ष

रेगडी-विकासपल्ली परिसरात विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त महावितरणचे दुर्लक्ष

ब्युरोचिफ प्रशांत शाहा
रेगडी: चामोर्शी तालुक्यातील रेगडी गावात मागील महिनाभरापूर्वी ३३/११केव्ही उपकेंद्र सुरू करण्यात आले होते मात्र महिनाभरातच उपकेंद्रातील ३३केव्हीचे ट्रान्सफार्मर मद्ये बिघाड झाल्याने उपकेंद्र झाले बंद रेगडी विकापल्ली गरंजी या गावाकरिता सध्या घोट येथून विद्युत पुरवठा देण्यात आली आहे.

परंतु रेगडी परिसर मोठा असल्याने नेहमीच परिसरातील बत्ती गुल होत आहे. विजेचा लपंडावामुळे शेतकरी सुध्दा त्रस्त झाले आहेत. महावितरण कडे कर्मचारी कमी असल्याने होत आहे विजेचा त्रास हे मात्र नक्की एकदा वीज पुरवठा खंडित झाली की सहा ते आठ तास राहतो वीज पुरवठा बंद असतो. म्हणून त्वरित रेगडी येथील उपकेंद्र सुरू करण्यात यावी अन्यथा
घोट येथील महावितरण कार्यालयात आंदोलन करू असा इशारा रेगडी येथील माजी उपसरपंच रमेश दयालवार,लक्ष्मण कुळमेथे,प्रकाश शाहा,प्रशांत मोहूर्ले, बाबाफरीद पठाण,विश्वनाथ गेडाम आदींनी केली आहे.

कर्मचारी कमी असल्याने समाजसेवक करतात विजेचा काम
रात्रो बे रात्रो वीज पुरवठा खंडित होत असल्याने समाजसेवक आपली जिवाची पर्वा न करता करत आहेत कार्य. विकासपल्ली येथील सरोजीत बल्लव,रेगडी येथील प्रशांत शाहा,बंडू नेवारे,नितेश गावडे हे महावितरणला मदत करत असतात..

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!