Homeचंद्रपूरगोंडपिंपरीधाबा हिवरा परिसरात भिकारचोट चोरट्यांनी मारला शेतकऱ्यांच्या झटका मशिनीवर ताव...हिवरा येथील शेतकरी...

धाबा हिवरा परिसरात भिकारचोट चोरट्यांनी मारला शेतकऱ्यांच्या झटका मशिनीवर ताव…हिवरा येथील शेतकरी शंकर येलमुले यांची शेतातील झटका मशीन चोरली…..

तालुक्यात मागील वर्षीपासून भिकारचोट झटका मशीन चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. हेटी नांदगाव पुलियापासून हिवरा धाबा नाला पुलिया पर्यंत हिवरा येथील शेतकर्यांचे कपासी शेतशिवार आहे. शेतकरी पिकाच्या सुरक्षेसाठी वन्य प्राण्यांपासून होणारी पिकांची नासधूस टाळण्यासाठी झटका मशीन चा वापर करतात.

अशातच मागील वर्षी सुद्धा त्या लगतच्या शेतशिवारातील दोन झटका मशीन चोरीने गेल्या होत्या. व यातच काल रात्री च्या दरम्यान या भिकार चोट चोरट्यांनी हिवरा येथील शेतकरी श्री शंकर येलमुले यांच्या शेतातील ८५०० रुपये किंमतीची झटका मशीन चोरल्याचा प्रकार घडला. रात्रभर जागली चे संकट टाळण्यासाठी शेतकरी ही उपाय योजना करतात. मग अशा शेतीच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या झटका मशीन भिकारचोट चोरटे चोरल्याने ऐन अडचणीच्या वेळेवर शेतकरी हतबल होतात.अश्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी शंकर येलमुले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!