वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एका शेतकऱ्याचा मृत्यू…चंद्रपूर व गडचिरोली मध्ये वाघाची दहशत कायम..

0
226

इंडिया दस्तक ब्युरो
सावली: शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना सावली तालुक्यातील गेवरा खुर्द येथे घडली. शालीकराम चापले असे मृतकाचे नाव आहे. मृतक इसम हे गेवरा खुर्द.येथील रहिवासी होते.

सध्या धानपीकात निंदणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.निंदण काढण्यासाठी शेतात मजूर दिसून येत आहेत. सावली तालुक्यातील बहूतांश शेती जंगलालगत आहे.बुधवारला नेहमीप्रमाणे शालीकराम चापले हे शेतात काम करण्यासाठी गेले असता अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.

या हल्यात चापले यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहीती वनविभागाला देण्यात आली.वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला.या घटनेने परिसरातील शेतकरी बांधव दहशतीत आहेत.

दुसरी कडे गडचिरोली जिल्ह्यात पण अनेक वाघाचे हल्ले झाले असून अनेक नागरिक आपले जीव गमावले आहेत
तरी वनविभागाने या विषय कठोर निर्णय घेऊन त्वरित या वाघाचे विल्हेवाट लावावे अशी मांगणी जनते कडून केली जात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here