Advertisements
शरद कुकूडकार
भंगाराम तळोधी प्रतिनिधी
Advertisements
गोंडपिपरी:तालुक्यातील मौजा भंगाराम तळोधी येथील एका व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि.1 सप्टेंबर रोज बुधवारला उघडकीस आली.सुधाकर मित्थावार असे मृतकाचे नाव असून भंगाराम तळोधी येथील रहिवासी आहे.
भ.तळोधी येथील येग्गेवार शेतकामासाठी शेतात गेले असता त्यांना विहिरीत मानवी मृतदेह तरंगतांना दिसले. त्यांनी लगेच गावातील पोलिस पाटील यांना घटनेची माहीती दिली.घटनेची माहीती मिळताच गोंडपिपरी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पुढील तपास गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू करीत आहेत.
Advertisements
Advertisements