अबब! दुचाकी वाहनावर सवलतीच्या नावावर वाहनचालकांना चक्क कोटींचा घातला गंडा…400 वाहनचालकांना 2 ते 3 कोटींचा घातला गंडा..

0
396

गडचिरोली प्रतिनिधी: कोणतेही दुचाकी वाहन घ्या त्याच्या किमतीवर 10 हजार रुपयांची सुट मिळवा, असे सवलतीचे आमिष दाखवून गडचिरोली शहरातील शुभम कमलाकर मडावी व सदानंद जगदीश टोमटी या युवकांनी गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील जवळ जवळ 400 दुचाकी वाहनधारकांकडून नगदी रक्कम घेऊन वाहन उपलब्ध करून देताना ते वाहन फायनान्स कंपनीचे कर्जावर उचल करून नगदी रकमेचा मोठा हिस्सा स्वतःचे घशात घालत गंडवले असल्याची लेखी तक्रार फसवणूक झालेल्यांपैकी काही लोकांनी गडचिरोली पोलीस स्टेशन येथे 10 ऑगस्ट रोजी केली आहे. पोलीसांनी मात्र ही तक्रार चौकशीमध्ये ठेवली आहे.

कोणतेही दुचाकी वाहन घ्या त्याच्या किमतीवर 10 हजार रुपयांची सुट मिळवा, असे सवलतीचे आमिष दाखवून गडचिरोली शहरातील शुभम कमलाकर मडावी व सदानंद जगदीश टोमटी या युवकांनी गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील जवळ जवळ 400 दुचाकी वाहनधारकांकडून नगदी रक्कम घेऊन वाहन उपलब्ध करून देताना ते वाहन फायनान्स कंपनीचे कर्जावर उचल करून नगदी रकमेचा मोठा हिस्सा स्वतःचे घशात घालत गंडवले असल्याची लेखी तक्रार फसवणूक झालेल्यांपैकी काही लोकांनी गडचिरोली पोलीस स्टेशन येथे 10 ऑगस्ट रोजी केली आहे. पोलीसांनी मात्र ही तक्रार चौकशीमध्ये ठेवली आहे.

प्राप्त माहितीनुसार मागिल वर्षी कोविड काळात शुभम मडावी व सदानंद टोमटी हे दोघे वाहन विक्रेते म्हणून ग्रामीण भागातील अनेक लोकांना भेटले व त्यांनी दुचाकीच्या किमतीत 10 हजार रुपयांची सुट देऊन वाहन उपलब्ध करून देण्याची योजना सांगितली. मुळ वाहन निर्मिती कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी करीत असल्यामुळे आम्ही ही सुट देऊ शकतो असे सांगितले. या सुटीच्या आमिषाला अनेक लोक बळी पडले व त्यांनी वाहनाच्या किमती पेक्षा 10 हजार रुपये कमी व आवश्यक पॅन कार्ड, आधार कार्ड, इलेक्ट्रीकचे बिल व फोटो देऊन वेगवेगळ्या वाहनविक्रेत्यांकडून वाहन विकत घेतले. मात्र सदर वाहन देताना वाहनाचे कोणतेही कागदपत्रे दिले नाहीत. कोरोनामुळे ते पोस्टाने मिळतील असे सांगितले गेले. या खरेदी व्यवहाराला जवळजवळ वर्ष पूर्ण होत आल्यानंतर विविध फायनांन्स कंपन्यांचे कर्मचारी गावांमध्ये पोहोचले व त्यांनी सदर वाहनमालकांना तुमचे वाहन हे आमच्या कंपनीकडून फायनांस करून घेतले असे सांगत थकित कर्जाचे हफ्ते भरा अन्यथा वाहन घेऊन जाऊ अशी दमदाटी करायला लागले तेव्हा हा फसवणूकीचा प्रकार पुढे आला.

या  फायनान्स कंपन्यांमध्ये बेरार फायनान्स,, मंगलम  फायनान्स, श्रीराम  फायनान्स व इतर काही  फायनान्स कंपन्यांचा समावेश आहे. बेरार फायनान्स ने एड. सुरज गुप्ता मार्फत ग्राहकांना नोटीसही बजावल्या आहेत.

या प्रकरणात केवळ शुभम मडावी व त्याचा सहयोगी सदानंद टोमटी या दोघांचाच समावेश नसून वाहन विक्री एजंसीमधील काही लोक व फायनांस कंपन्याच्या कर्मचाऱ्यांची मिलीभगत असल्याचा आरोप फसवणूक झालेल्या लोकांनी केला आहे. सोमवारी जवळजवळ 150 च्या आसपास वाहनचालकांनी बेरार फायनान्स च्या गडचिरोली शाखेत येऊन त्यांचेवर असलेल्या कर्जाची कागदपत्रे मागितली असता कर्मचारी व व्यवस्थापकाने ती देण्यास असमर्थता दर्शविली. वाहनधारकांच्या कोणत्याही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे ते देऊ शकले नाहीत. फसवणूक झालेल्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करून अविलंब गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here