रेगडी पोलिसांनी सुरु केले भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र…

0
492
Advertisements

गडचिरोली: चामोर्शी तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओढकल्या जाणाऱ्या पोलीस मदत केंद्र रेगडी येथील प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री,नंदकुमार शिंब्रे यांनी मागील काही दिवसांमध्ये रेगडी पंचकृषितील तरुनिसाथी,महिला,वृद्ध व सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची मने जिंकली आहेत. गरिबांना मदत करणे, तरुणांना नोकरी, खेळ, शिक्षण यासाठी मदत करणे इत्यादीमुळे रेगडी परिसरात त्यांची खूपच लोकप्रियता वाढली आहे.

सद्या त्यांनी परिसरातील होतकरू तरुण व तरुणीनसाठी पोलीस मदत केंद्रामध्येच भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. सदर रेगडी व एटापल्ली परिसरातील अनेक होतकरू मुलांनी सहभाग घेतला असून त्यामध्ये 23 मुली व 30 मुलं असून आणखी मुलं येतं आहेत.

Advertisements

सर्व प्रशिक्षणार्थिना psi शिंब्रे हे मोफत पुस्तके, शूज, टी शर्ट -पॅन्ट देत आहेत तसेच अभ्यासिकेचीही सोय केली असून मार्गदर्शन करीत आहेत.psi शिंब्रे यांनी सांगितले कि दुर्गम भागातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी गडचिरोली येथे जाणे व पैसा खर्च करणे शक्य होत नाही त्यासाठी आम्ही उत्तम दर्जाचे प्रशिक्षण येथेच देण्याचा प्रयत्न करीत असून प्रत्येक रविवारी प्रशिक्षणनार्थीची सराव परीक्षा घेण्यात येणार आहे.

Psi शिंब्रे यांनी परिसरातील आणखी तरुण्णांनी सदर प्रशिक्षणास सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.सदरचा उपक्रम हा मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पो. अधी. सोमय्या मुंडे सो. अप्पर पो. अधी. समीर शेख व गडचिरोली विभागाचे पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा साहेब यांच्या प्रेरणेतून व मार्गदरणातून केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here