धक्कादायक: प्रेमप्रकरणात जन्मलेल्या एका नवजात बालकाला शासकीय विहिरीत फेकले…

0
569

-प्रीतम गग्गुरी (प्रतिनिधी)

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात एका कुमारी मातेने प्रेमप्रकरणात जन्मलेल्या एका नवजात बालकाला शासकीय विहिरीत फेकून दिल्याची मन हेलावून टाकणारी घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कुरखेडा तालुक्यातील वाकडी गावात ही घटना घडली आहे. वाकडी गावातील काही मुले सार्वजनिक विहिरीच्या आवारात खेळत होती.

दरम्यान मुलांना विहिरीच्या पाण्यात काहीतरी तरंगताना दिसले. त्यामुळे मुलांना गावातील लोकांना याबद्दल सांगितले. गावकऱ्यांनी जेव्हा विहिरीकडे धाव घेतली आणि पाहणी केली असता सर्वांना धक्का बसला. गावकऱ्यांनी तातडीने याबद्दलची माहिती पोलीस स्टेशनला कळवली.

कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीची पाहणी केल्यानंतर नवजात बाळाला बाहेर काढण्यात आले. पण नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाले. नवजात मृत मुलाला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर तपास सुरू केला.

गावात चौकशी केल्यानंतर एका कुमारी मातेने हे कृत्य केल्याचं समोर आलं. या मातेनं त्या नवजात मुलाला प्रेम प्रकरणातून जन्म दिला होता. पण, बाळ नकोसे अशल्यामुळे विहिरीत फेकून दिल्याची कबुली तरुणीनं दिली. पोलिसांनी या प्रकरणी या तरुणीला अटक केली असून अधिक तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here