HomeBreaking Newsसावधान: थेट नागपूरच्या पोलीस आयुक्तांच्या नावानं फेक फेसबूक अकाउंट बनवून पैश्याची मागणी...

सावधान: थेट नागपूरच्या पोलीस आयुक्तांच्या नावानं फेक फेसबूक अकाउंट बनवून पैश्याची मागणी…

-मुकुल पराते (नागपूर शहर प्रतिनिधी)

नागपूर : शहरात गेल्या काही दिवसापासून क्राईम वाढताना दिसत आहे. या ठिकाणी अनेक गंभीर गुन्ह्याचे सत्र समोर येत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात सायबर गुन्हेगाराने नागपूरच्या पोलीस आयुक्तांच्या नावानं फेसबूक अकाउंट काढून एका राष्ट्रवादीच्या नेत्याची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत संबंधित राष्ट्रवादीच्या नेत्यानं सांगितल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सायबर सेलला चौकशीचे आदेश दिले आहेत.

कोरोनाच्या काळात सायबर गुन्हेगारांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या काळात अनेकांना गंडा घालण्यात आला. याबाबात अनेक वेगवेगळ्या केसेस पोलीस ठाण्यात दाखल देखील झाले आहे. मात्र आता एक अनोखाच प्रकार समोर आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे अज्ञातांनी थेट नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नावानं बनावट फेसबुक अकाउंट तयार केलं होतं.

त्यानंतर आरोपीनं पोलीस आयुक्तांच्या फेक अकाऊंटवरून राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष रुपेश पन्नासे यांच्याकडे पैशाची मागणी केलीय. तसेच, आरोपीने फेसबुक मॅसेंजरच्या माध्यमातून पैशाची मागणी केल्यानं रुपेश पन्नासे यांना संशय आला. यांनतर त्यांनी तात्काळ यांनी थेट पोलीस आयुक्तांना फोन करून यावरून विचारणा केली. विचारणावेळी आपण असे कोणते पैसे मागितलं नसल्याचं पोलीस आयुक्तांनी पन्नासे यांना सांगितलं.

दरम्यान, यानंतर अज्ञात याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नावानं बनावट फेसबुक अकाउंट तयार करून पैशांची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे. यांनतर पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, बनावट अकाउंट ब्लॉक देखील केले आहे. या घटनेवरून शहरात एकच खळबळ उडाली आहे. अशा प्रकरणावरून लोकांना सावधगिरीच्या सूचना देखील सायबर सेलकडून देण्यात आला आहे.

 

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!