Homeनागपूरनागपूरमध्ये भरदिवसा गोळीबार; कायदा व सुव्यवस्थेचे वाजले तीन तेरा...

नागपूरमध्ये भरदिवसा गोळीबार; कायदा व सुव्यवस्थेचे वाजले तीन तेरा…

-मुकुल पराते शहर प्रतिनिधी नागपूर

नागपूर: नागपुरात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याने सातत्याने होत असलेल्या गुन्हेगारी घटनांवरून समोर येत आहे. 9 ऑगस्ट रोजी सकाळी भरदिवसा नागपुरात एका जुन्या वादातून काही युवकांनी एक तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी दोन राउंड गोळ्या फायर केल्या आणि त्या मोहसीन नावाच्या युवकाला लागल्या.

या गोळीबारामुळे मोहसिन हा गंभीर जखमी झाला असून त्याला नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नागपुरातील गीतांजली टॉकीज चौकात सकाळच्या सुमारास ही घटना घडलेली असून पोलीस आरोपींच्या शोधात असून लवकरच या गोळीबारामध्ये सहभागी असलेल्या आरोपींना अटक करण्यात येईल असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!