आष्टी पेपर मिल चे स्थलांतर न करता त्याच ठिकाणी ठेवा….# पेपरमिल अन्यत्र कुठेही नेण्याचा प्रयत्न केल्यास प्रकल्पग्रस्त शेतकरी व कामगारांचा आंदोलन करण्याचा इशारा…

0
1151

इंडिया दस्तक न्यूज टीव्ही
हरिश्चंद्र मंगाम
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
आष्टी येथे गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेली पेपर मिल मधील ए-फोर मशीन बल्लारशहाला स्थानांतरित करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न असून पेपर मिल प्रशासनाने आष्टी येथून अन्यत्र कुठेही नेण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा त्या विरोधात मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा ठेकेदारी कामगार व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी दिला.
सविस्तर वृत्त असे की आज मौजे ईल्लूर येथे ग्रामपंचायत भवनात प्रकल्पग्रस्त शेतकरी व कामगार आणि पेपरमील व्यवस्थापन यांची बैठक ठेवण्यात आली होती. या बैठकीत प्रामुख्याने कामगारांच्या बाजूने मा. जितेंद्र शिकतोडे दंडाधिकारी.चामोर्शी मा.कूमारसिंग राठोड पोलीस निरीक्षक आष्टी व सामाजिक कार्यकर्ता मा.
संजूभाऊ पंदीलवार, जिल्हा परिषद सदस्या सौ.रूपालीताई एस पंदीलवार, पं समीती सदस्य मा.शंकर आक्रेड्डीवार ग्रामपंचायत सरपंच तुळशीरामजी मडावी, रामच़द्र पा.बामनकार उपसरपंच, व आष्टी येथील सरपंच्या सौ. बेबिताई बूरांडे सोबत ठेकेदारी कामगार व प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत पेपरमिल व्यवस्थापनाच्या वतीने पेपर मिल चे पर्सनल मॅनेजर मा.अजय दूरकर व मा.डिलेनसिंग दिसेन प्रॉडक्शन मॅनेजर होते
यात कामगारांना १८ दीवस काम, राहण्याची सोय व ये- जा करणाऱ्या कामगारांना बस उपलब्ध करू
असे आस्वासन देण्यात आले.
मात्र कामगारांना ते मान्य केले नाही साधारणता अडीच तास चर्चा चालली मात्र या चर्चेतून काही निष्पन्न झालेले नाही शेतकरी आपल्या मागणीवर ठाम असल्याने या बैठकीमध्ये कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here