Homeगडचिरोलीमराठा व कुणबी विद्यार्थ्यांना "सारथी'' मार्फत स्पर्धा परीक्षेकरिता प्रशिक्षणाचा लाभ...

मराठा व कुणबी विद्यार्थ्यांना “सारथी” मार्फत स्पर्धा परीक्षेकरिता प्रशिक्षणाचा लाभ…

-प्रितम गग्गुरी (प्रतिनिधी)

गडचिरोली : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ( सारथी) पुणे मार्फत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी ( अराजपत्रित) गट-ब (PSI-STI-ASO) पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण प्रायोजित करण्यात आले आहे. त्यासंबंधीची जाहिरात सारथी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली असून विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.

महाराष्ट्र राज्यातील अनेक होतकरु विद्यार्थी राज्यसेवेत आपले भविष्य घडविण्याचे स्वप्न पाहतात परंतु अनेकवेळा आर्थिक पाठबळ व कोचिंग अभावी होतकरु व हुशार विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या रिंगणातून बाहेर पडतात. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेकवेळा आर्थिक विवंचनेमुळे शिक्षण पूर्ण करु शकत नाहीत . त्यामुळे लक्षित गटातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्टया सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्यसेवा क्षेत्रात सक्षम व उच्चशिक्षित अधिकारी घडविण्याकरीता सारथीमार्फत एमपीएससी (अराजपत्रित) गट -ब (PSI-STI-ASO) ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आयोजित केले आहे.

या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी ” सारथी ” मार्फत अर्ज मागविण्यात आले असून यासाठी विद्यार्थी कोणत्याही शाखेचा पदविधर असावा. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने तज्ञ मार्गदर्शकांकडून ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड कागदपत्रे पडताळणीद्वारे करण्यात येईल. तरी ” सारथी ” ने उपलब्ध करुन दिलेल्या नि:शुल्क प्रशिक्षणाच्या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन यश प्राप्त करावे . वरील सर्व प्रशिक्षणासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2021 आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https:// sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळास भेट द्यावी . असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!