Homeगडचिरोलीशेतकऱ्यांनो, ९ व्या हप्त्याचे 2000 रुपये लवकरच येणार, यादीत तुमचं नाव ‘असं’...

शेतकऱ्यांनो, ९ व्या हप्त्याचे 2000 रुपये लवकरच येणार, यादीत तुमचं नाव ‘असं’ तपासा…पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी…

प्राप्त माहितीनुसार, 9 ऑगस्ट रोजी पीएम किसान सन्मान निधीचा 9 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाणार आहे. देशातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजने अंतर्गत मिळणाऱ्या 2 हजार रुपयांच्या नव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
पंतप्रधान किसान सम्मान निधी (PM kisan Samman Nidhi) अंतर्गत शेतकर्‍यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. आतापर्यंत 8 हप्ते शेतकर्‍यांना देण्यात आले आहेत. देशातील 12.11 कोटी शेतकर्‍यांना 9 व्या हप्त्याचे पैसे दिले जातील. हा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.
*नोंदणीसाठी आता उशीर नको…*
जर तुम्ही अद्याप या योजनेत नोंदणी केली नसेल तर उशीर करू नका. तुम्ही या आठवड्यात नोंदणी केली, तर हे शक्य होणार आहे. पडताळणीनंतर तुम्हाला 9 व्या हप्त्याचा लाभ देखील मिळू शकेल. त्याची ऑफलाईन आणि ऑनलाईन नोंदणी खुली आहे केवळ गेल्या दोन महिन्यांत 21 हजार कोटी रुपये थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर शेतीसाठी पाठवण्यात आले आहेत.
पीएम किसान योजनेत तुमचं नाव आहे का?
● सर्वप्रथम पंतप्रधान किसान योजनाच्या https://pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा
यानंतर तुम्हाला होमपेजवर Farmers Corner पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.
● या कोपऱ्यात Beneficiaries List , लाभार्थी यादीचा पर्याय येईल त्यानंतर त्यावर क्लिक करावे लागेल.
आता डॅशबोर्डवर क्लिक करावे लागेल व राज्य, जिल्हा, तहसील, ब्लॉक आणि गाव निवडावे लागणार आहे.
●  त्यानंतर Get Report गेट रिपोर्टवर क्लिक करा.
आता गावातील लाभार्थ्यांची संपूर्ण यादी तुमच्या समोर येईल. यामध्ये आपण हे पाहू शकता की योजनेचे पैसे कोणाला मिळवू शकतात.
पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या संबंधित या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 4000 हजार रुपये मिळण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. या वर्षाचा पहिला हप्ता जारी झालाय आणि दोन हप्ते शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत पात्र शेतकरी ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, जर त्यांनी स्वतःची नोंदणी केली, तर त्यांना आठव्या आणि नवव्या हप्त्याचे 2-2 हजार मिळू शकतात म्हणजे एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!