कमलेश निमगडे यांचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही….काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा खुलासा

0
834
Advertisements

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )

एका तलाठ्याकडून लाच घेताना पकडण्यात आलेले कमलेश निमगडे यांचा काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केला आहे.

Advertisements

प्राप्त माहितीनुसार सविस्तर असे की , करंजी साजा चे तलाठी खांडरे यांच्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या.’तुमची बदनामी आणि बदली टाळायची असेल तर वीस हजार रु लागतील …’ अशी मागणी करणाऱ्या कमलेश निमगडे यांना गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतेच रंगेहात पकडले.
ते स्वतःला काँग्रेस पक्षाचे जिल्हा सचिव म्हणवून घेत होते…! माध्यमातून त्यांचा काँग्रेसचे जिल्हा सचिव म्हणूनच उल्लेख व्हायचा..!

तथापि सदर घटनेनंतर जिल्हा काँग्रेस ग्रामीण कमेटी चे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी एका प्रेस नोट द्वारे कळवले आहे की ,कमलेश निमगडे काँग्रेसचे पदाधिकारी नसून काँग्रेसची त्यांचा कोणताही संबंध नाही.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here