” ती ” आजी आहे नंबर वन…आजी-नातवाचा प्रेमाची अनोखी कहाणी

0
586
Advertisements

गोंडपिपरी: आजी-आजोबांचा लळा नातवाना असतोच.अश्यात गोंडपिपरी तालुक्यातील एका नातवाचे जगच आजीची कुस ठरली आहे.तब्बल अठरा वर्षापासून तो आजीचा खांद्यावर वावरतो. त्याचे सर्व अवयव निकामी झालेले आहेत.त्याचा हावभावावरून त्याची गरज आजी ओळखते.नातवाला मायेची ममता देणारी ही आजी नंबर वन ठरली आहे.या आजीचे नाव आहे सुनिता दयालवार.

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा गावाची संतनगरी अशी ओळख आहे.या गावातील आजीची पंचक्रोशीत चर्चा आहे.सुनिता दयालवार,सदाशिव दयालवार यांची मोठी मुलगी कल्पना यांचा विवाह मुल तालुक्यात येणाऱ्या
सिंताळा येथिल शरद कानमपेल्लीवार यांचाशी झाला.त्यांचे पहीले अपत्य होते यश.यशचा जन्म झाला तेव्हा सर्व कूटुंब आनंदात होते.मात्र या आंनदावर काळाने विरजन टाकले.जन्माचा तिसऱ्या दिवशी यशला काविळ आजार झाल्याचे निदाध करण्यात आले.चंद्रपूरचा एका खाजगी रूग्णालयात यशवर उपचार करण्यात आले.मात्र उपचाराला यशचा शरीराने प्रतिसाद दिला नाही. यशचे वय वाढू लागले मात्र सामान्य बालकाप्रमाणे त्याचा शरीराची तथा मेंदूची वाढ झाली नाही. तपासणी अंती यश पुर्णताहा अस्थीव्यंग तथा मंतीमंद झाल्याचे निदान करण्यात आले. आई कल्पना ,वडील शरद यांना यशचा मोठा जिव्हाळा होता.मात्र यशने आजी सुनिता दयालवार यांचे हृदय जिंकले होते.काही वर्ष आई वडीलांकडे राहीलेल्या यशला आजीने घरी आनले.यशने आजीला चांगलाच लळा लावला होता.यशचा हावभावाने त्याला काय हवे,काय नको हे आजी ओळखायची. यश स्वताचा पायावर उभा होवू शकत नाही.त्याला निट बोलताही येत नाही.सामान्य मुलाप्रमाणे तो शौच,लघवी करू शकत नाही.जन्मापासून आजतागायत आजीची कुस अन खाट हेच यशचे जग झाले आहे.आज यशचे वय अठरा वर्षे झाले.अठरा वर्षात यशने आजीचा खांद्यावरच सर्वाधिक वेळ घालविला आहे.यशचा आई ,वडीलांनी अनेकदा यशला सोबत नेण्याचा विचार केला मात्र आजी सुनिताबाईने प्रत्येक वेळी नकार दिला.अठरा वर्ष झालीत आजही यश आजी आजोबाकडेच आहे.आजी म्हणजे यशचे जिव की प्राण आहे.यश म्हणजे आजीसाठी जगण्याचा श्वास आहे.आजी नातवाचे हे नाते पंचक्रोशित चर्चिले जात आहे.यशचा आजीकडे बघून आम्हालाही अशीच आजी लाभो असे गावातील नातवंडे बोलतात.

Advertisements

आजोबा,मामा,मामीचाही लळा…!

यशचे आजोबा सदाशिव दयालवार,मामा सूदर्शन ,मामी संगिता यांनाही यशने लळा लावला.दयालवार आणि कानमपेल्लीवार परिवार यशची काळजी घेतात.या दोन्ही परिवाराचा प्रेमानेच यशला जगण्याची उर्जा मिळत आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here