माढेली –जडका–केळी–नागरी बस सेवा सुरु करा:– अभिजित कुडे

0
52
Advertisements

वरोरा:– माढेली –जडका–केळी–नागरी बस सेवा सुरु करा असे निवेदन आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अभिजित कुडे यांनी आगार व्यवस्थापक श्री रामटेके साहेब वरोरा याना दिले.

विद्यार्थांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे , बस सेवा बंद असल्या मुळे विद्यार्थि सायकल ने शाळेत जाण्यास मजबूर आहे . विद्यार्थ्यांनी निवेदन देउन देखील बस सुरु करण्यात आली नाही लवकरात लवकर बस सुरू करावी अशी विनंती केली.

Advertisements

कोरोना पूर्व काळात ही बस सुरू होती पण सध्या ती बस सेवा बंद आहे त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो आहे . विद्याथ्र्यांचे कॉलेज शाळा सुरू झाल्या असून त्यांना अतिरिक्त पैसे खर्च करून प्रवास करावा लागतो आहे व त्या मार्गाने खासगी वाहन सुद्धा नाही त्यामुळे त्वरित बंद असलेली बस सेवा सुरु करावी, सर्व चालू झाले असून निवेदन देउन देखील बस सुरु केली नाही तर आम्हीं विद्यार्थांना सोबत घेउन आंदोलनं सुरू आता शाळा, कॉलेज, शिकवणी वर्ग सुरु झाले आहे तरी त्यांना प्रवास करायला बस बंद असल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

शुल्लक कारण सांगून बस सुरू करण्यास टाळाटाळ करत आहे. त्वरित बंद असलेली बस सेवा केली नाहीं तर आंदोलनं करू अशा इशारा देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष सचिन मांडवकर, संकेत वानखेडे , ऋषिकेश पाटील , रोशन भोयर उपस्थित होते.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here