Homeचंद्रपूरचंद्रपुर महानगरपालिकेच्या आमसभेत गोंधळ...

चंद्रपुर महानगरपालिकेच्या आमसभेत गोंधळ…

चंद्रपूर : आमसभेत घुसून बॅनरबाजी करणारे काँग्रेस नगरसेवक आणि सत्ताधारी भाजप नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकले. एवढेच नाही तर स्थायी समिती सभापती रवी आसवानी आणि नंदू नागरकर यांनी एकदुसऱ्यांवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. या अभूतपूर्व गोंधळामुळे काही मिनिटे सभा तहकूब करण्यात आली. हा प्रकार गुरुवारी चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या आमसभेत घडला.

कोविडच्या पार्श्वभूमीवर मनपाची आज ऑनलाइन आमसभा आयोजित केली होती. सभा सुरू झाल्यानंतर काही वेळात मनसेचे नगरसेवक सचिन भोयर अमृतच्या विषयावरून कार्यकर्त्यांसह सभागृहात प्रवेश करून निषेध नोंदवला.

त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनीही सभागृहात येऊन बॅनरबाजी केली. या प्रकाराला सत्ताधारी नगरसेवकांनी विरोध केला. तेव्हा काँग्रेस आणि सत्ताधारी भाजप नगरसेवक समोरासमोर आले. शाब्दिक बाचाबाची सुरू असतानाच सभापती आसवानी आणि नागरकर यांनी एक दुसऱ्यांवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला. त्यानंतर महापौर यांनी काही मिनिटांसाठी सभा तहकूब केली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!