अतिक्रमित दुकानदारामुळे बस स्थानक वर ट्रॅफिक जाम…

0
150

वरोरा : स्थानिक शेगाव बू येथील दर सोमवार ला आठवळी बाजार भरत असून चिमूर वरोरा नॅशनल हायवे रोड वरच दुकानदार आपली दुकाने लावत असल्याने वाहनाला ये जा करण्या करिता मोठी कसरत करावी लागत असून या अडचणी मुळे बस स्थानक वर तास भर ट्रॅफिक जॅम असते …त्यामुळे प्रवास्यांना मानसिक तसेच शारीरिक त्रास करावा लागत आहे

विशेष म्हणजे वरोरा – शेगाव – चिमूर नॅशनल हायवे रोड चे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून सध्याच्या परिस्थितीत शेगाव वरील मुख्य मार्गावरून तसेच बस स्थानक लागत नाली बांधकाम सुरू असून या नाली मुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून आठवळी बाजारातील अनेक दुकाने मुख्य मार्गावर लागत असल्याने वाहन , ग्राहक , तसेच दुकानदारांची अधिक कोंडी होत असते त्यामुळे वाहतूक ये जा करण्या साठी मोठी कसरत होत असल्याने या वाहतूक कोंडी मुळे च्छोटे मोठे अपघात नाकारता येत नाही.

तेव्हा या गंभीर कडे स्थानिक पोलीस स्टेशन तसेच ग्रामपंचायत कार्यालयांनी अधिक लक्ष्य केंद्रित करून रस्त्यावरील वाहने दुकाने तात्काळ हटविण्यात यावे अशी मागणी जनता करू लागली आहे.. रस्त्यालगत असलेल्या आम्ही मोठ्या व्यावसायिकांना रस्त्यावर बसत असलेल्या दुकानदार मुळे आमच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना देखील याचा मोठा नाहक त्रास होतो .. इतकेच नव्हे तर आमच्या दुकान समोर दू चाकी तसेच चार चाकी वाहने देखील उभे राहतात त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here