गडचिरोली विश्व हिन्दू परिषद बजरंग दल तर्फे वृक्षरोपन आणि वृक्ष वाटप उपक्रम..#सेवा- संस्कार – सुरक्षा हे उद्देश्य समोर ठेवून कार्य करण्याचे केले आवाहन…

0
150

नितेश खडसे (जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली)

*गडचिरोली* : – खूप वर्षपासून जुलै महिन्यातील पहिला सप्ताह हा वृक्षारोपण दिवस म्हणून समजले जाते. मानव आणि निसर्ग यांचा भरपूर पुराना संबंध आहे. या निसर्गातूनच मानवाचा जन्म झाला आहे. मानव या निसर्गातूनच जन्माला आला, वाढला आणि इथेच विलीन सुद्धा झाला. या निसर्गातून मानवाला अनेक गोष्टी या मिळू लागल्या. म्हणून त्याचे जीवन जगणे अत्यंत सोपे झाले. तसेच झाडे ही पर्यावरणाचा एक महत्वाचा घटक आहेत.

वृक्ष हे फक्त मानवाच्या जीवनाचा आदाहर नाही आहेत तर प्रत्येक प्राणी आणि पक्षी यांच्या जीवनाचा सुद्धा आधार आहेत. मानव घर बांधून राहू शकतो.

आज काही वर्षांपूर्वी औद्योगिकीकरण आणि शहरीकरण वाढल्यामुळे झाडांचे प्रमाण नष्ट होत चालले आहे. मानव वृक्षांची तोड करून इमारती बांधण्यासाठी तसेच कारखाने वाढवून सिमेंटचे जंगल उभे करत आहे. जंगल तोड होत असल्यामुळे जंगलांचा नाश होत आहे. तसेच जमीन खराब होत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी आपण सर्वानी जास्तीत – जास्त झाडे लावणे गरजेचे आहे त्याचेच औचित्य साधून गडचिरोली नगर विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे शहरातील नवीन बसलेल्या शिव नगर येथे वृक्षारोपण तसेच फळांचे झाड वाटप करण्यात आले आणि घरोघरी वृक्ष लावण्याचे आव्हाहन केले.

विश्व हिंदू परिषद बजरंग दल च्या सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम मध्ये सहभागी सर्व सभासदांचे अभिनंदन केले आणि आव्हान केले की समाजातील सर्व बंधूनी, युवकांनी एकत्र येऊन समजाला जागृत करून सेवा- संस्कार – सुरक्षा हे उद्देश्य समोर ठेवून कार्य करायला पूढे यावे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here